सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

वेंगुर्ला भाजपातर्फे विविध सेवाभावी उपक्रम घेऊन भाजपाचा स्थापना दिन साजरा केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर व बुथवर पक्षाचा झेंडा उभारला. तर पिराचा दर्गा येथील कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जनसंघापासून भाजपाच्या वाटचालीत तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या ११ जणांचा प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अनंत लक्ष्मण नेरूरकर (आडेली), प्रकाश महादेव करंगुटकर (पालकरवाडी), भानुदास नारायण शिरगावकर (दाभोली), सत्यविजय शिरगावकर (उभादांडा), रामेश्वर देवस्थानचे ट्रस्टी रविद्र परब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर, सामाजिक कार्यकर्त्या रत्नप्रभा गुरुनाथ प्रभूसाळगावकर, ज्येष्ठ भजनी कलाकार सखाराम वामन तथा आपा मांजरेकर, ज्येष्ठ साई सेवेकरी मधुकर वेंगुर्लेकर, जेष्ठ ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आजोबा मांजरेकर आदींचा समावेश होता. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, राजन गिरप, सोमनाथ टोमके, साईप्रसाद नाईक, प्रशांत खानोलकर, मनवेल फर्नांडीस, अनंत केळुसकर, प.म.करंगुटकर, स्मिता दामले, हरेश कोंडसकर, शरद मेस्त्री, शेखर काणेकर, प्रशांत केळुसकर, हसिनाबेन मकानदार, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, वृंदा गवंडळकर, ओंकार चव्हाण, ईशा मोंडकर, शुभांगी कनयाळकर, श्रेया मयेकर, शीतल आंगचेकर ज्ञानेश्वर केळजी, प्रकाश रेगे, रमेश नार्वेकर, प्रशांत आपटे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu