नुकसान भरपाईसाठी बागायतदारांची मागणी

सन २०२२-२३ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा पिकाची नुकसानी झाली असून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे व कोकणातील शेतक­यांवर प्रथमच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने सर्व परिस्थितीचा विचार करून विनाविलंब पंचनामे करून शेतक­यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा काजू उत्पादक बागायतदार संघ सिंधुदुर्गच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन वेंगुर्ला तहसीलदार कार्यालय येथे सादर केले. यावेळी आंबा काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर तसेच प्रकाश बोवलेकर, शामसुंदर राय, किशोर नरसुले, विरेंद्र आडारकर, सदानंद पेडणेकर आदी उपस्थित होते. सकाळचे तापमान २० ते ३१ से. इतके राहत असून या सर्वांचा आंबा पिकावर विपरीत परिणाम झाला असून चालू हंगामात आंबा पिकाचे उत्पादन १० टक्के पेक्षा कमी राहणार आहे. त्याचप्रमाणे मागील दोन महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आंबा फळावर चट्टे पडले असून अशा मालाची बाजारपेठांमध्ये विक्री होणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला असून शेतक­यांनी केलेल्या औषधाचा खर्चही येणा­-या उत्पन्नातून भरून येणार नाही. शेतक­यांनी खते व औषधांसाठी केलेला खर्च तसेच बँकांकडून घेतलेले कर्जही परतफेड करणे यंदा शक्य होणार नाही. त्यामुळे शासनाने विनाविलंब पंचनामे करून शेतक­यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

 

 

Leave a Reply

Close Menu