दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० मे रोजी ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपातर्फे सुखटणवाडी येथील दिव्यांग सायमन फर्नांडीस यांच्या निवासस्थानी तर गाडीअड्डा तिठा येथील चहा विक्रेते दिव्यांग अनिल नाईक यांना युडीआयडी कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, बाबली वायंगणकर, प्रितेश राऊळ, पपू परब, आनंद मेस्त्री, अस्मिता मेस्त्री इत्यादी उपस्थित होते. विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांना घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र आवश्यक आहे. वेंगुर्ला तालुक्यातील बहुतांश दिव्यांग हे युडीआयडी कार्डापासून वंचित होते. ही अडचण लक्षात घेऊन माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड शिबिराचा १५० दिव्यांगांनी लाभ घेतला होता. सर्व तपासण्या एकाच ठिकाणी झाल्यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले.

 

Leave a Reply

Close Menu