मैत्री करताना सावधानता बाळगा

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त महिला विकास कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग वेंगुर्लातर्फे राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्घाटन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी.आर.आरोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला विकास कक्षाच्या चेअरमन प्रा.डॉ.मनिषा मुजूमदार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शमिष्ठा सामंत, समुपदेशक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, डॉ.धनश्री पाटील आदी उपस्थित होते.

     मुलींनी मैत्री करताना सुद्धा सावधानता बाळगावी. सोशल मिडियावर मुलींनी आपला फोटो ठेऊ नये. कुठल्याही अमिषाला बळी पडू नये. स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी केले. मुली व महिलांनी शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि स्वतःचे संरक्षण स्वतः करावे असे डॉ.पाटील यांनी सांगितले. मुलींनी सामाजिक शिस्त पाळावी, स्वतःच्या संरक्षणासाठी प्रशिक्षण घ्यावे व आत्मनिर्भर बनावे असे मत प्रा.आरोलकर यांनी व्यक्त केले.

      प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुस-­या दिवशी ऋत्विक राणे, अॅग्नॅलो कार्डोज, हार्दिक रेडकर, श्रावणी कुडव यांनी विद्यार्थीनींना स्वसंरक्षणासाठी कराटे तसेच स्वसंरक्षणाच्या विविध तंत्राचे प्रशिक्षण दिले. यावेळी माधुरी मेस्त्री, गीता परब यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थीनी उपस्थित होते. सूत्रसंचालन संध्या मोरे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना युनिट अधिकारी प्रा.सदाशिव चुकेवाड यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu