विद्यार्थ्यांनी घेतली शेतीची प्रात्यक्षिके

विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड व शेतक­यांबद्दल आदर निर्माण व्हावा. शेती विषयी माहिती मिळावी, शेतीसाठी लागणारे बी बियाणे, शेतीची अवजारे, खते, किटकनाशक औषधे आदींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने बळीराजासाठी एक दिवसहा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रि.एम. आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने बांधावरची शाळाउपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुलांनी शेतावर जाऊन शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शेतीच्या विविध कामांसहित तरवा काढणे, लावणी, शेतीच्या पारंपरिक व आधुनिक पद्धती, भातांच्या विविध जाती तसेच अन्य शेतीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu