कल्याणकारी योजना मतदारांपर्यंत पोहचवा – अजयकुमार मिश्रा

शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर जनतेचे काम करणारे सरकार कसे असते याचा अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. याचाही फायदा आपल्या पक्षवाढीसाढी होणार आहे, तरी बूथवरील कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आपल्या बुथवरील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन केंद्रीय गृह राज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी परबवाडा येथे केले.

     भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्ग रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी व केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी वेंगुर्ला-परबवाडा ग्रामपंचायतहद्दीत बुथ क्रमांक ५७ मधिल कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बुथवरील कार्याची माहीती दिली. तसेच बुथकमिटी व पन्ना प्रमुखांची जबाबदारी विशद केली. यावेळी व्यासपिठावर लोकसभा क्लस्टरचे सहसंयोजक प्रमोद जठार, लोकसभा मतदारसंघांचे संयोजक अतुल काळसेकर, ठाण्याचे जिल्हाध्यक्ष संदिप लेले, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष व सावंतवाडी विधानसभा निवडणूक प्रमुख राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते.

      यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री मिश्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे स्थान उंचाविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. या सुधारणा-या परराष्ट्र संबंधांचा लाभ देशातील सामान्य नागरिकांना मिळेल, याची काळजी ते घेतात. त्यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप यशस्वी होत आहे. मोदींच्या विचारांचा आणि कामाचा केंद्रबिंदू हा देशातील गरीब, वंचित, पिडीत, शोषित, दलित, मागास माणुस असतो त्यामुळेच मोदी सरकारने गेल्या ९ वर्षात अंत्योदयाच्या योजना आणल्या, त्यामुळेच गोरगरीब जनता विविध योजनांचे लाभार्थी बनले आहेत. सर्वसामान्य जनतेप्रमाणे पक्षातील कार्यकर्त्यांनाही पंतपधान नरेंद्र मोदी हे कुटुंबप्रमुखांसारखे आधार वाटतात आणि हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे सांगितले.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी मनवेल फर्नाडिस यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला माजी सभापती सारीका काळसेकर, शक्तीकेंद्र प्रमुख पपू परब, बुथ प्रमुख संजय मळगांवकर, सरपंच शमिका बांदेकर, सदस्य हेमंत गावडे, स्वरा देसाई, सुहीता हळदणकर, कार्तिकी पवार, कृष्णाजी सावंत, रविंद्र परब, सत्यवान परब, दत्तात्रय धुरी , कृतीका साटेलकर, समिर चिंदरकर यांच्यासह अन्य पन्ना प्रमुख उपस्थितीत होते.

 

Leave a Reply

Close Menu