विविध उपक्रमांनी केसरकर यांचा वाढदिवस साजरा

राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला शहर शिवसेनेतर्फे शहरप्रमुख उमेश येरम यांनी वेंगुर्ला मार्केटमधील हनुमान मंदिरात केसरकर यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य मिळावे यासाठी महारूद्र करण्यात आला.  दरम्यान, २० निमंत्रित संघाच्या खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले. तर कॅम्प भागात वसुंधरा बचाव अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा बदाम व कडुलिबू या वृक्षांची लागवड करण्यात आली. वेंगुर्ला शाळा नं.४ मधून शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना नितीन मांजरेकर, उमेश येरम, स्वप्निल चमणकर, बाळा दळवी, गणपत केळुसकर, प्रकाश मोटे, संतोष परब, अॅड.श्रद्धा बावीस्कर, शबाना शेख, सुनिल डुबळे, मुख्याध्यापक पी.डी.कांबळे, सुधीर धुरी, प्रा.हेमंत गावडे, सॅमसन फर्नांडिस आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu