वेंगुर्ल्यात राष्ट्रीय बोन्साय कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर बोन्साय क्लब केबीसीच्या 11 व्या वर्ध्ाापन दिनानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे मधुसुदन कालेलकर मल्टीपर्पज हॉल येथे राष्ट्रीय पातळीवरील बोन्साय या विषयावर सृजनशील कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन साऊथ एशियन बोन्साय फेडरेशनचे अध्यक्ष रवींद्र दामोदरन (तामिळनाडू) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व उंबराच्या बोन्सायला पाणी देऊन झाले. 100 बोन्साय झाडांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते झाले.

      बोन्साय यामोदरी, सुईसेकी विषयावर झालेल्या कार्यशाळेचा तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश येथून आलेल्या सहभागींनी नाविन्यपूर्ण घेतलेल्या कार्यशाळेचा अनुभव घेतला. कार्यशाळेच्या निमित्ताने आणलेल्या 100 पेक्षा जास्त बोन्साय झाडांची नगरपरिषदेच्या कविवर्य मंगेश पाडगावकर बालोद्यानात शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी केली होती.

     उद्घाटन प्रसंगी एसएबीएफचे सुधीर जाधव, राजीव वैद्य, मुंबई एसबीआयच्या सुजाता भट, आयडब्लूएसएच्या डॉ. रिटा मुखोपाध्याय, सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, आयडब्लूएसएच्या डॉ. सीमा गायकवाड, कोल्हापूर बोन्साय क्लबच्या अध्यक्षा सुनिती देशमुख, गार्डन क्लब कोल्हापूरच्या अध्यक्ष कल्पना सावंत, हॉर्टिकल्चर कॉलेज मुळदेचे डॉ. भोसले, गार्डन क्लब कोल्हापूरचे ज्येष्ठ सदस्य अरूण नरळे, शांतादेवी डी. पाटील आदी मान्यवरांसह विज्ञान, कला, वनस्पतीशास्त्र, खडकशास्त्रमधील तज्ज्ञांचा समावेश होता.

      मुख्याधिकारी कंकाळ यांनी कार्यशाळेच्या नाविन्यपूर्णतेविषयी ज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असे सांगितले. सकाळच्या सत्रात यमोदरी विषयावर गेली 40 वर्षे अनुभव असलेल्या साऊथ एशियन बोन्साय फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र दामोदरन यांनी प्रात्यक्षिकांसहित बोन्साय कशी केली जातात याची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात मुलभूत पद्धतीचे बोन्साय विषयावर सुनिती देशमुख यांनी सादरीकरण केले. बोन्सायची प्रक्रिया कशी केली जाते याचे प्रात्यक्षिकही दाखविले. कोल्हापूर बोन्सायचे सचिव बोंगळे यांनी फॉरेस्टटाईप बोन्साय कसे केले जाते याचे संपूर्ण प्रात्यक्षिक करून दाखविले. दुपारी डच वखार येथे वाढलेली फायकसची प्रजाती व यामोदरी या सहलीचे आयोजन करण्यात आले. नगर परिषदेचा मिरल पार्क प्रोजेक्ट पाहण्यासाठी कार्यशाळेतील 170 सभासदांनी सहभाग घेतला.

      खडकांचे सैौंदर्य दाखविणारी सुईसेकी ही कला कशा प्रकारे विकसीत करता येईल याबाबत सुधीर जाधव तर सलीम अली ऑरनिथॉलॉजी सेेंटरच्या धनुषा कवलकर यांनी वेेंगुर्ला रॉक्स येथील जैवविविधतेबद्धल चित्रफितीद्वारे माहिती दिली. भूगर्भ शास्त्रामध्ये विविध खडक प्रदर्शनामध्ये मांडून ‘चला डोक्याक दगड भरूया’ या प्रदर्शनातील खडकाचे विज्ञान आणि प्रकार अतिशय सुंदररित्या मांडून डॉ. अभिजीत पाटील व डॉ. योगिता पाटील यांनी प्रबोधन केले. जबलपूर येथून आलेले श्री. सिंग यांनी विविध प्रकारचे खडक प्रदर्शनात विक्रीसाठी मांडले.

      कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचे कौतुक करून परिश्रम घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आयोजकांनी सन्मान केला. खर्डेकर महाविद्यालयाच्या डॉ. प्रा. धनश्री पाटील यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. याबद्दल साऊथ एशियन बोन्साय फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र दामोदरन यांनी त्यांचाही सन्मान केला.

Leave a Reply

Close Menu