लम्पी मुक्तीचा फॉर्म्युला

कोव्हिड 19 संसर्ग, स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू यासारख्या समस्यांना तोंड देत असताना गुरांमध्ये पसरत चाललेला लम्पी रोग हा चिंतेचा विषय बनला आहे. हा विषाणूजन्य रोग गोवंश आणि जर्सी-होलीस्टीन वर्गातील जनावरांना होऊ शकतो. आहे. हा रोग किटकांपासून पसरतो. माशा आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळेही हा रोग पसरतो. यामुळे ज्याप्रमाणे मेल्यानंतर शरीर कुजत जाते तसे अक्षरशः जीवंत असताना शरीराचा एकेक भाग मरण यातना देत निष्क्रीय होत जातो. त्वचेवर दिसण्ााऱ्या परंतु शरिरातील सर्व अवयवांमध्ये पसरण्ााऱ्या या रोगामध्ये गुरांना ताप येणे, त्वचेवर गाठी येणे, डोळे-नाकातून स्राव, जास्त लाळ, दुधाचे उत्पादन कमी,भूक मंदावणे ही लक्षणे दिसून येतात. लम्पी रोग हा संसर्गजन्य असल्याने उपचार करताना हा रोग अन्य जनावरांमध्ये होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्‍यक ती काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. याकरिता पर्यावरणप्रेमी आर्किटेक्ट अजित परब यांनी गौसंजीवन कल्की या जैविक रसायनाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत वेंगुर्ला, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, पुणे, नागपूर याठिकाणी लम्पी आजाराने त्रस्त झालेल्या शेकडो गाई-वासरे गौसंजीवन कल्कीच्या वापराने लम्पीमुक्त झाल्या आहेत. रोग आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून आपण कल्कीचा वापर करू शकतो.

      कल्की कसे वापरावे?- लम्पीवर मात करण्यासाठी प्रति गोवंश, किमान दोन लिटर गौसंजीवन कल्की एक दिवसआड वापरावे. त्यापेक्षा जास्त म्हणजे अगदी 8-10 लिटर गौसंजीवन कल्की प्रति गोवंश वापरल्यास उत्तमच. यासोबतच गोठ्यात सर्वत्र आणि शेण टाकायच्या जागी म्हणजेच गायरीवर सुद्धा गौसंजीवन कल्कीचा वापर करणे योग्य राहील. यामुळे लम्पीबाधित गोवंशाच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच इतर गोवंश लम्पीपासून सुरक्षित राहील. जर्सी, होलीस्टीन तसेच म्हशींच्या बाबतीतही हे लागू पडते. (कुत्र्यांसाठी करावयाचे असल्यास सहा दिवसांचे अंतर ठेवावे.)

      गौसंजीवन कल्कीमध्ये दुप्पट पाणी मिसळून प्राण्याच्या अंगावर ओतावे. तसेच संपूर्ण गोठ्यात, गोठ्याच्या आजूबाजूला व शेण टाकायच्या जागेवर शिंपडावे किंवा फवारणी करावी. यासाठी कटाक्षाने प्लास्टीक बादली व प्लास्टीक मग वापरावा. हे एक दिवसआड करावे. संपूर्ण गोठ्यात एकाच दिवशी करावे. पुढे दिलेला लाकडी घाण्याचे मोहरी तेल लावण्याचा उपाय याच्या बरोबरीने केला तर लम्पीच्या संकटातून सर्वांची सुटका होईल.

      गौसंजीवन कल्कीने आंघोळ घालायच्या जागी इतर कोणत्याही फवारण्या करू नयेत. किटकनाशके फवारू नयेत.फिनाईल – डेटॉल वगैरे मुळीच वापरू नये. आंघोळ घालायच्या जागी धूर करू नये. कारण गौसंजीवन कल्कीच्या वापरामुळे डास, माशा व गोमाशांच्या संख्येत लक्षणीय घट होते. आणि ते परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. (त्यामुळे शेणी किंवा पाने जाळून धूर करू नये.)

      मोहरी तेल लावताना – मानेच्या पुढे – पाठीला व पोटाला लावावे. पायांना – गुडघ्यापर्यंत तेल लावावे. मानेच्या खाली तसेच चेहऱ्याला तेल लावू नये. शेपटीलाही तेल लावू नये.

      लाकडी घाण्याचे तेल लावण्याचा हा उपाय दर दोन दिवसआड (म्हणजेच दर तिसऱ्या दिवशी) एकदाच करावा आणि शक्यतो दुपारी करावा. जेव्हा कल्कीयुक्त पाण्याने आंघोळ आणि मोहरी तेल मालीश हे दोन्ही उपाय एकाच दिवशी येतील तेव्हा दुपारी मोहरी तेल लावावे आणि सूर्यास्तानंतर आंघोळ घालावी.

      जखमांवरील उपाय- लाकडी घाण्याच्या (cold pressed) मोहरी तेलामध्ये शुध्द हळदपावडर मिसळावी व त्याचा लेप जखमांवर लावावा. आवश्‍यकतेप्रमाणे दिवसातून दोन-तीन वेळा असा लेप लावावा. जखमा उघड्या ठेवाव्या. त्या बांधून ठेवू नयेत. जनावरांनी जखमा चाटल्या तरी चालते. यासाठीची हळदपावडर सेंद्रीय तसेच जात्यावर दळून बनविलेली असल्यास उत्तम परिणाम मिळतात.

      कल्की वापरताना घ्यावयाची काळजी?- 1) रात्रौच्या वेळी गायी-वासरांना गौसंजीवन कल्कीच्या पाण्याने आंघोळ घातल्यामुळे  त्या आजारी पडतील अशी काळजी करू नये. तथापि प्रमाणाबाहेर थंडी असल्यास पाण्याने भरलेली प्लास्टीक किंवा तांब्या-पितळीची बादली सकाळच्या ऊन्हात उघडी ठेवून कडक ऊन गेल्यानंतर लाकडी फळीने झाकून ठेवलेले ते पाणी सूर्यास्तानंतरच्या आंघोळीसाठी वापरावे. मात्र पाणी हे कायम साधेच आणि नैसर्गिक थंड असावे. चुलीवर/गॅसवर/हीटर/गिझरने गरम केलेले पाणी मुळीच वापरू नये. जनावरांना ताप आलेल्या स्थितीतही एक दिवसआड रात्रौ आंघोळ घालणे सुरू ठेवावे.

      2) गौसंजीवन कल्की बनवताना आणि वापरताना हात स्वच्छ असावेत, त्यांना कोणत्याच प्रकारचा वास असू नये. शक्य असल्यास चुलीतल्या राखेने हात स्वच्छ धुवावेत आणि राख उपलब्ध नसल्यास मातीने हात धुवावेत आणि कोठेही न पुसता केवळ हवेने वाळल्यावर काम करावे.

      3) गौसंजीवन कल्की बनविताना आणि वापरताना केवळ प्लास्टिकची भांडी वापरावी. लोखंड, स्टील, अँल्युमिनीयम किंवा पितळी वगैरे धातूची भांडी, बादली वा तांब्या वापरू नये. प्लास्टिकची भांडी शक्यतो नवीन असावीत किंवा जूनी असल्यास त्यांना गोमूत्र, शेण किंवा कोणत्याही रसायनाचा वास असू नये , ती स्वच्छ असावीत.

      4) बादलीत द्रावण घेऊन प्लास्टिक तांब्याच्या सहाय्याने थेट आंघोळ घालावी किंवा पंपाच्या सहाय्याने फवारणी करावी. फवारणीसाठीचा पंप स्वच्छ (शक्यतो नवीन) असणे आवश्‍यक आहे. त्याला कोणत्याही रसायनाचा/ कीटकनाशकाचा वास असू नये.

      5) गौसंजीवन कल्कीच्या वापराने डास, माशा आदी कीटकांचे नियंत्रण होत असल्याने, गोठ्यात शेणी जाळणे वा कडूनिंब वगैरे झाडपाल्याचा धूर करणे पूर्णपणे टाळावे. अर्धवट वा पूर्ण ज्वलनामुळे वातावरणावरच   ताण येतो.

      6)गौसंजीवन कल्कीमिश्रित पाण्याची आंघोळ/फवारणी शक्यतो सूर्यास्तानंतर पासून रात्रीपर्यंतच्या वेळेत करावी. त्यानंतर गोठ्यात अंधार करावा.

      7) जनावरांना ताप आलेला असल्यास त्यांच्या दोन्ही नाकपूड्यांत प्रत्येकी दहा पंधरा थेंब मोहरी तेल सोडावे. असे दर पाच तासांच्या अंतराने करत रहावे. (कितीही ताप असला तरीही पाच तासांच्या आत पुन्हा वापरू नये.)

      8) यासाठी प्लास्टिकची ड्राँपर बाटली वापरावी. यासाठीचे तेल cold pressed असल्यास अतिशय उत्तम. तसे नसल्यास मंद फिरणाऱ्या लाकडी घाण्याचे तरी असावे. जोराने फिरणाऱ्या मशीनवर तेल काढताना ते गरम झालेले असते व तेल गरम झाले असता त्यातील सर्व औषधी गुणांचा नाश होतो, त्यामुळे असे तेल कोणत्याच कामाचे रहात नाही.

      गौसंजीवन कल्कीच्या वापराने एक दिवस आड आंघोळ, अंगाला दोन दिवस आड लाकडी घाण्याचे मोहरी तेल एवढ्या सहज उपायांनी गोवंश लम्पीमुक्त होतो. निरोगी गायींना लम्पीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा याचा आपण वापर करून आपले तसेच सर्व प्राण्यांचे उत्तम आरोग्य टिकवू शकतो. याचा खर्च प्रती गोवंश रु. दोन हजार ते चार हजार पर्र्यंत येतो. Ajitkumar Parab या युट्यूब चॅनलवर लम्पीवर मात (1 व 2) आपण पाहू शकता. गौसंजीवन कल्की घरी बनवायची असल्यास/त्यासंबंधी अधिक माहितीकरिता संपर्क – अजितकुमार परब  9421144222, 7262013022  

Leave a Reply

Close Menu