तुज पंख दिले देवाने…
हल्लीच मुंबईला एका लग्नाला गेले होते. त्यावेळी नीताला अचानक समोर बघून मला आश्चर्य वाटले. नीता म्हणजे माझी लहानपणीची शेजारची सखी! माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असून नापास होत होत माझ्या वर्गात आली होती. १० वीत दोनदा नापास झाल्यावर मात्र घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले…