वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश रेगे

ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ला या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा १४ जून रोजी साई मंगल कार्यालयात अध्यक्ष शामराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक रा.पां.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२५-२६च्या अहवाल व जमाखर्चास मंजूरी देणे, हिशोब तपासणीसची नियुक्ती करणे आदी कामकाज पार पडले. या सभेत सन २०२६ ते २०२९ अशा तीन वर्षांसाठी नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी प्रकाश रेगे (न्हैचिआड), उपाध्यक्ष-सगुण माळकर (तुळस), कार्यवाह-जगदीश तिरपुडे (वेंगुर्ला), सहकार्यवाह-रामचंद्र घोगळे (वेंगुर्ला), सदस्य-गुरूनाथ बांदवलकर (दाभोली), दिपक खडपकर (वायंगणी), शांताराम आईर (मठ), प्रमोद खांडेकर (शिरोडा), शामराव काळे (वेंगुर्ला), किशोर नरसुले (उभादांडा), विवेकानंद परब (तुळस), निमंत्रक-एम.पी.मेस्त्री (रेडी), कायमस्वरूपी सल्लागार-रा.पां.जोशी आणि र.बा.पिंगुळकर आदींचा समावेश आहे. या निवडीनंतर रा.पां.जोशी यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष शामराव काळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश रेगे, गुरूनाथ बांदवलकर, एम.पी.मेस्त्री यांनी आपले विचार मांडले. शामराव काळे यांनी अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सभेदरम्यान, वेंगुर्ला न्यायालयाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन आयोजित केले होते. अॅड.धनंजय झांटये आणि पल्लवी कामत यांनी शासनाकडून करण्यात येणाऱ्या सहाय्य योजनांची माहिती दिली. सदरील मार्गदर्शन आयोजित करण्यासाठी जयराम वायंगणकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply