
वेंगुर्ला न.प.ने शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १ एप्रिलपासून वेंगुर्ला क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानगाळ्यांना सुधारित भाडेवाढ व अनामत रक्कम जमा करण्याची नोटीस दुकानमालकांना दिली आहे. किंबहूना ही भाडेवाढ वेंगुर्ल्यातील दुकानमालकांवर अन्याय करणारी असून त्याला तत्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सदर विषयावर तोडगा काढण्यासाठी संबंधित यंत्रणेतील घटक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व इतर अधिकारी वर्गासमवेत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
