७६ पथविक्रेत्यांना धनादेशाचे वितरण

कोरोनाच्या काळात व्यवसाय बंदीचा फटका पथविक्रेत्यांनाही बसला आहे. यातून त्यांना सावरण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वनिधीतून पथविक्रेत्यांना कर्जाऊ रक्कमेचे धनादेश देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. या योजनेंतर्गत वेंगुर्ला शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून स्थिर-अस्थिर आणि तात्पुरत्या स्वरुपाचा व्यवसाय करणा-या सुमारे ७६ पथविक्रेत्यांना शहरातील राष्ट्रीयकृत बँकांद्वारे प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप त्या त्या बँकांमधून करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर विनयप्रकाश वर्मा, युनियन बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर रामकुमार वर्मा, पत्रकार के.जी. गावडे, अजय गडेकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, पाटलेकर, बँक स्टाफ, कर्मचारी आदींच्या उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu