हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शनिवारी सायंकाळी वेंगुर्ला पोलिस ठाण्याच्यावतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नवाबाग-मांडवी खाडीत ‘‘बचाव कार्याचे प्रात्यक्षिक‘‘ घेण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवरी, विजय कुंडेकर, हेड कॉन्स्टेबल वासुदेव परब, रमेश तावडे, पोलीस नाईक दादा परब, नितीन चोडणकर, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, पांडू खडपकर, परशुराम सावंत, मनोज परुळेकर तसेच होमगार्ड गिरप, केळुसकर आदी सहभागी झाले होते. अतिवृष्टी काळात नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.