स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेत संतोष मंगेश मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर सर्वोत्तम स्वच्छ हॉटेल, शाळा, रुग्णालय, रहिवासी संकुल स्पर्धेतील विजेत्यांसह कच-यापासून कलाकृती प्रदर्शनात सहभागींना गौरविण्यात आले.
इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेत संतोष मेस्त्री यांनी प्रथम, अजय खानोलकर यांनी द्वितीय तर शिरसाठ बंधू यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच सर्वोत्तम स्वच्छ हॉटेलसाठी हॉटेल मायबोली, सर्वोत्तम स्वच्छ रुग्णालय म्हणून उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, सर्वोत्तम स्वच्छ शाळा म्हणून वेंगुर्ला हायस्कूल आणि सर्वोत्तम स्वच्छ रहिवासी संकुल म्हणून आनंदी अर्पित, भटवाडी यांना गौरविण्यात आले.
दि. १ व २ ऑक्टोबर रोजी कच-यापासून कलाकृती, टाकाऊपासून टिकाऊ आणि कच-यापासून इंधन निर्मिती यावर प्रदर्शन आयोजित केले हते. या प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या पंकज घोगळे, रागिणी मोर्ये, संदेश राऊळ, सुधीर गावडे, हर्ष पिळणकर, सुरेखा शिदे, ऋषिकेष जाधव, बॅरी लुद्रिक, गौरव आजगांवकर, श्रुती मेस्त्री, जानवी पालव, सोहम सूर्यवंशी, केतकी आपटे, चिन्मय मराठे व श्रुती वाघमारे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सर्व स्पर्धांसाठी व प्रदर्शनासाठी स्वच्छता संदेश दूत सुनिल नांदोस्कर व प्रा.वसंतराव पाटोळे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. याच कार्यक्रमात कु. चिन्मय मराठे याने स्वच्छतेतून समृद्धी हा जनजागृतीपर उद्बोधक संवाद साधला.
यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दिलीप गिरप, स्वच्छता संदेश दूत सुनिल नांदोस्कर, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अतुल मुळे, वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन. सावंत, नगरसेवक प्रशांत आपटे व शितल आंगचेकर उपस्थित होते.