कर्नाटकातील सागरकिनाऱ्यावरील यक्षगान मराठी भाषेत
दशावतार! राबणाऱ्या माणसांची लोककला! सुंदर परंतु तितकाच रांगड्या अभिनयासह लोककलेच्या साऱ्या छटांसहित प्रकट होणारा, अत्यंत लोभसवाणा वाटावा असा लोकरंगभूमीवरील एक खेळ होय. खेडोपाडीच्या कष्टकरी, श्रमजीवी माणसांच्या संस्कृतीतून उदयाला आलेली, माणसाच्या अंगी असलेल्या शक्ती, बुध्दी अन् दुर्दम्य इच्छाशक्ती यांचा पुरस्कार करणारी ही कला होय.…
