एंडोस्कोपीद्वारे काढली पोटात टोचणारी पिन

महाड येथील एका खेडेगावात राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीने एक टोकदार पिन तोंडात धरली होती. त्याचवेळी अचानकपणे ती पिन तिच्या घशात गेली. मुलीने घाबरून ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगितली. आई वडीलांनी तिला त्वरित शासकीय रुग्णाल्यात दाखल केले. तेथे एक्स-रे केल्यावर ती पिन मुलीच्या जठरामध्ये आढळली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुंबई किंवा पुणे येथे उपचारार्थ दाखल करण्यासाठी सांगितले. परंतु हा खर्च न परवडण्याजोगा असल्याकारणाने तिच्या वडिलांंनी बी.के.एल. वालावलकर रुग्णालय गाठले. तेथे प्रसिद्ध ग्रॅस्ट्रोलॉजिस्ट डॉ.आनंद जोशी यांनी एंडेस्कोपीद्वारे पिन काढण्याचा निर्णय घेतला. अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आलेल्या प्रक्रियेत कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीच्या सहाय्याने पिन बाहेर काढण्यात आली. हे उपचार अत्यंत अल्प दरात उपलब्ध झाले.

Leave a Reply