साप्ताहिक किरातच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

‘वाचू आनंदे’ उपक्रमाअंतर्गत वेंगुर्ला येथे नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये साप्ताहिक किरातच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक देवदत्त परुळेकर, फूले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, प्रा.सुनील नांदोस्कर, नगर वाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार, तरुण भारतचे प्रदीप सावंत, पत्रकार महेंद्र मातोंडकर, किरात ट्रस्टचे विश्वस्त तथा नगरसेवक प्रशांत आपटे, किरातचे मेघशाम मराठे, किरातच्या संपादक सीमा मराठे, शशांक मराठे आदी उपस्थित होते.

Leave a Reply