वेंगुर्ला-मालवण रस्त्यावर कोसळली दरड

13 जूनच्या रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला - मालवण सागरी महामार्गावरील दाभोली येथे फॅक्टरीजवळ मुख्य रस्त्यावर दरड कोसळली. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वेंगुर्ला गुड मॉर्निंग ग्रुप त्या मार्गाने सकाळी जात होता. त्यांनी ही कोसळलेली दरड पहिली आणि सामाजिक बांधिलकी…

0 Comments

ग्रंथालय पुस्तक निर्मितीसाठी राज्यस्तरावर रामा पोळजी यांच्या पुस्तकाची निवड

    तळवणे, ता. सावंतवाडीचे सुपुत्र तथा जि.प.शाळा मठ कणकेवाडीचे उपक्रमशील शिक्षक व कवी रामा वासुदेव पोळजी यांच्या ‌‘रंग मनाचे‌’ या कवितासंग्रहाची समग्र शिक्षा अंतर्गत राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.       विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य आत्मसात होण्याकरता त्यांच्या अनुभवाशी नाते जोडणारी पुस्तके पूरक वाचनासाठी उपलब्ध…

0 Comments

बोगस बियाणे, खतांपासून शेतकऱ्यांनी सावध रहावे

  जिल्हा परिषद कृषी विभाग व तालुका कृषी विभागातर्फे अधिकृत विक्री केंद्रावर वारंवार तपासण्या होतात. मात्र, तरीही काही कंपन्या थेट गावागावांमध्ये पोहोचून विविध आमिषे दाखवून बोगस खते, बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. यापासून सावध राहण्यासाठी शेतकऱ्यांनीच सतर्क होण्याची गरज आहे, असा सल्ला शास्त्रज्ञ आणि…

0 Comments

मी मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडायची काहींना सवयच ः दीपक केसरकर

वेंगुर्ला एसटी आगाराला नवीन ५ एस टी गाड्या १० जून रोजी प्राप्त झाल्या. या गाड्यांचे १२ जून रोजी आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम या ५ एसटी बस वेंगुर्ला आगाराला मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचा शाल व…

0 Comments

पावसाळ्यापूवची कामे अपूर्ण राहिल्याने विजेचा खेळखंडोबा

विद्युत महावितरणच्यावतीने पावसाळ्यापूव करायची 33 कामे सुचवण्यात आली होती. परंतु, त्यातील 3 कामे सुद्धा वेंगुर्ला तालुक्यात न झाल्याने नागरिकांना वारंवार विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच वीज बिल एजन्सीबद्दल बऱ्याच वीज ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना…

0 Comments

वेंगुर्ले आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

        शिवरायांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांना माणसाप्रमाणे जगता आले पाहिजे यासाठीच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी त्यांनी त्याकाळी केलेला राज्यकारभार आजही आदर्श मानला जातो. राजा होणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा नव्हती. प्रजेला सुख, समाधान व संरक्षण…

0 Comments

अंडरवॉटर म्युझियमची मुहुर्तमेढ : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

        ‘आयएनएस गुलदार‌’ या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेत पाण्याखालील संग्रहालय आणि या जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी 10…

0 Comments

नागरी कृती समितीकडून ‘स्पॉट पंचनामा‘

यंदाच्या मे महिन्यातच बरसलेल्या अवकाळी पावसाने वेंगुर्ला शहरात चाललेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांनी स्वतः हस्तक्षेप करत पालिका प्रशासनाच्या अनेक गोष्टी लक्षात आणून दिल्या असल्या तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. याचाच परिणाम म्हणून संतापलेल्या नागरिकांनी पुन्हा ‘वेंगुर्ले शहर…

0 Comments

वेंगुर्ला आगारास नवीन पाच बसेस प्राप्त

वेंगुर्ला आगारातील एसटी बससे जुन्या झाल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी पाठविताना नियत्रकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेतर्फे मातोंडचे सुपुत्र असलेले माहिम मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांच्या करण्यात आली होती. त्यानुसार महिन्याभरातच…

0 Comments

शहरासाठी पोलीस पाटीलाची नियुक्ती करा!

वेंगुर्ला शहरामध्ये गेली कित्येक वर्षे पोलीस पाटील नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तरी त्वरित पोलीस पाटीलाची नेमणूक करून शहरवासीयांची गैरसोय दूर करावी अशी मागणी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.      शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी…

0 Comments