वेंगुर्ल्यातील वाहतुक पोलिसांचा सत्कार

गणेशोत्सवाच्या काळात उत्तमरित्या आपले कर्तव्य पार पाडणा­या वेंगुर्ला पोलिस स्थानकाच्या वाहतुक पोलिसांचा वेंगुर्ला तालुका युथ संस्था व लोकराज्य मंचतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव, युथ संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीनिवास गावडे, लोकराज्य मंच सचिव निहाल शेख यांच्यासह मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.…

0 Comments

निशाण तलाव ओव्हर फ्लो

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे पडलेल्या मुसळधार पावसाने सप्टेंबर अखेरीस निशाल तलाव ओव्हर फ्लो म्हणून पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. स्वयंचलित असलेले गोडबोले गेट जास्त पाऊस पडल्यास पाण्याच्या दाबाने काही प्रमाणात उघडते आणि पाण्याचा दाब कमी झाल्यास परत बंद होते.…

0 Comments

‘अमृत कलश यात्रेला‘ उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मेरी मिट्टी मेरा देश‘ उपक्रमा अंतर्गत वेंगुर्ला पंचायत समिती आणि शिरोडा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोडा येथे काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुक्यातील सर्व गावामधून आलेल्या अमृत कलशामधील माती एकत्र करून ‘अमृत कलश‘ ची यात्रा शिरोडा गावातून काढण्यात आली आणि…

0 Comments

रंगोत्सवमध्ये देसाई स्कूलचे यश

रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा मुंबई यांच्यातर्फे २०२३-२४ मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यात नॅशसन सिल्वर अवार्ड-आर्या कुडाळकर, आर्ट मेरिट अवार्ड-केतकी चेंदवणकर व चिन्मय पेडणेकर, विशेष पारितोषिक वेदा देसाई, आस्था कुडाळकर, प्राप्ती मोरे, तनिशा सातार्डेकर यांचा समावेश असून…

0 Comments

वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाचा रौप्य महोत्सव संपन्न

      वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघ वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, संघाचे संस्थापक अध्यक्ष रा.पां.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी ॲड.नारायण गोडकर यांनी ज्येष्ठ नागरिक समस्या व गैरसमज आणि 2007 चा ज्येष्ठ नागरिक कायदा, त्याची तरतूद याबाबत मार्गदर्शन केले.…

0 Comments

‘रंग अंतरंग’ पुस्तक प्रत्येकाकडे असलेच पाहिजे – डॉ. रूपेश पाटकर

           मनोविकार तज्ज्ञ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ बोटावर मोजण्याइतके तज्ज्ञ उपलब्ध आहेत. असे असताना सायकोथेरपीला सपोर्टिव्ह किवा सायकॉलॉजीचे महत्त्व अगदी सोप्या आणि दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडींची उदाहरणे देणारे ललित लेख लेखिका श्रुती संकोळ्ळी यांनी ‘रंग अंतरंग‘ या आपल्या पुस्तकात…

0 Comments

भंडारी मंडळातर्फे प्राचार्य बांदेकर यांचा सत्कार

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.अॅड.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भंडारी ऐक्यवर्धक मंडळातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  मंडळाचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर, उपाध्यक्ष रमण वायंगणकर,वृंदा कांबळी, सदस्य सुरेश बोवलेकर, उत्तम वैद्य, आनंद केरकर, जयराम वायंगणकर, गजानन गोलतकर, अंकिता बांदेकर, श्रेया मांजरेकर, कोचरेकर…

0 Comments

ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला, तालुका वकिल संघटना वेंगुर्ला व ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर रोजी साई मंगल कार्यालय येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला, तालुका…

0 Comments

संकेतस्थळामार्फत सहभाग प्रमाणपत्र मिळवा

केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छता पंधरावड्यांतर्गत वनविभाग सावंतवाडी आणि मांडवी खाडी किनारी कांदळवन मालवणतर्फे ‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत वेंगुर्ला मांडवी खाडी किनारी कांदळवन क्षेत्र परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमास प्रतिसाद लाभला. यावेळी सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी, मालवण कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल प्रदिप पाटील,…

0 Comments

क्रीडा मार्गदर्शक जयवंत चुडनाईक यांचा सत्कार

वेंगुर्ला तालुका क्रीडा केंद्राचे मार्गदर्शक व ज्येष्ठ कबड्डीपटू जयवंत चुडनाईक हे क्रीडा क्षेत्रात कबड्डी, मैदानी खेळ व इतर खेळांतील खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांचा विकास घडविण्यासाठी गेली ३० वर्षे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ…

0 Comments