एन.पी.मठकर अधिक्षक पदावर

दिवाणी न्यायालय कणकवली येथील सहाय्यक अधिक्षक (प्रशा) एन.पी.मठकर यांची जिल्हा न्यायालय सिधुदुर्ग-ओरोस येथे ‘अधिक्षक‘ (न्याय) या पदावर नियुक्ती झाली असून २५ जानेवारी रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी इतर कर्मचा-यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. सदरची पदोन्नती ही त्यांना गुणवत्तेनुसार जंपिगने मिळाली…

0 Comments

समिक्षा मळगांवकर ‘आदर्श अंगणवाडी कर्मचारी‘

वेंगुर्ला,परबवाडा-कणकेवाडी येथील रहिवासी तसेच तुळस कार्यक्षेत्रातील मिनी अंगणवाडी सेविका समिक्षा संजय मळगांवकर यांना शाल, प्रशस्तीपत्रक, राष्ट्रीय बचत पत्र व गौरवपत्र देऊन ‘आदर्श अंगणवाडी कर्मचारी‘ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी शर्मिष्टा सामंत, पर्यवेक्षिका माधुरी मेस्त्री, परबवाडा सरपंच, सदस्य व…

0 Comments

आबा खवणेकर

केळुस गावचे सुपुत्र तथा पत्रकार आबा खवणेकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार…

0 Comments

नंदन वेंगुर्लेकर

आधार फाऊंडेशन सिंधुदूर्गचे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांची नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. परिषद संस्थापक अध्यक्ष राम भारत जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे-पाटील यांनी वेंगुर्लेकर यांना नियुक्तीपत्र पाठविले आहे. या निवडीबाबत त्यांचे अभिनंदन होत आहे.

0 Comments

सौ. सानिका शेवडे

मळेवाड -कोंडुरे ग्रामपंचायती च्या सदस्य पदी सौ. सानिका शेवडे (पूर्वाश्रमीची तारा सुधाकर माडकर) हिची २२९ मतांनी निवड  झाली आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे. सौ. शेवडे या वेंगुर्ल्यातील उद्योजक माडकर बंधू यांच्या भगिनी, तर भजनी बुवा सुधा माडकर यांच्या कन्या होय.  

0 Comments

सौ. प्राची परांजपे

दापोली तालुक्या तील केळशी ग्रामपंचायत निवडणूकीत सौ. प्राची प्रसाद परांजपे यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आहे.  त्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे. सौ.परांजपे या वेंगुर्ल्यातील पुरोहित मोरेश्वर उर्फ भाई वैद्य यांच्या कन्या होय.

0 Comments

विश्वनाथ पंडित यांना पत्रभुषण पुरस्कार

वृत्तपत्र लेखक अभिजीत राणे युथ फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेत जेष्ठ वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांच्या पत्रास सर्वोकृष्ट पत्र म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

0 Comments

शोभा परब यांना जिजाऊ पुरस्कार

        परबवाडा येथील शोभा परब यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात रोजंदारी करुन स्वतःच्या मुलांना घडविले. आज त्यांचा मुलगा अॅड.मिलिद परब हा मुंबई हायकोर्टात प्रतिथयश वकील आहे. अशा पद्धतीने समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेल्या श्रीमती परब यांना राजमाता…

0 Comments

मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

नाशिक कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार सिधुदुर्गचे सुपुत्र, ज्येष्ठ कादंबरीकार मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर करण्यात आला आहे. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी २७ फेब्रुवारीला हा पुरस्कार प्रदान केला जाणार…

0 Comments

पत्रकार दिपेश परब यांचा सत्कार

जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळालेला वेंगुर्ला तालुक्यातील युवा पत्रकार दिपेश परब यांचा भाजपाच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

0 Comments