आत्रेया आचार्य महाराष्ट्र राज्यात दुसरी
वेंगुर्ला शाळा नं.१मधील इयत्ता दुसरीची विद्यार्थीनी आत्रेया नंदकिशोर आचार्य हिने गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर अंतर्गत घेतलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत १०० पैकी ९८ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तिला वर्गशिक्षक लिना नाईक, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर तसेच बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रा.टेमकर यांचे मार्गदर्शन लाभले.…
