गणपत मसगे यांना आदिवासी गिरीजन कलाकार पुरस्कार
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून दिला जाणारा आदिवासी गिरीजन कलाकार पुरस्कार सिंधुदुर्गचे सुपुत्र व राष्ट्रपती पुरस्कार विजेते पिंगुळी-गुढीपूर येथील लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ठाकर आदिवासी समाजाची चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चामड्याच्या बाहुल्या…
