सामुहीक राष्ट्रगीतानंतर तिरंगा दुचाकी रॅली संपन्न
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेक महाविद्यालयातील पटांगणावर सामुदायिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शहरात मोटरसायकल तिरंगा रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने वेंगुर्लावसीय सहभागी झाले होते. महाविद्यालयात पार पडलेल्या सामुदायीक राष्ट्रगीत कार्यक्रमात प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, माजी नगराध्यक्ष दिलीप…
