वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दररोज तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध

   विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपतर्फे तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून २०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात…

0 Comments

रामा शेणई, ऋतिक शिरोडकर स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न

कै. रामा शेणई व कै. ऋतिक शिरोडकर यांच्या स्मरणार्थ आयुष चॅलेंजर मित्रमंडळ परबवाडा व ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ८ ऑगस्ट रोजी परबवाडा शाळा नं. १ मध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ४० दात्यांनी रक्तदान करत सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला. शिबिराचे उद्घाटन जि.प.सदस्य…

0 Comments

संतोष गोखलेंचे जनसेवा कार्य अभिमानास्पद

दाभोली येथे कृषी, शैक्षणिक, आरोग्य व समाजोपयोेगी सेवेसाठी दाभोली येथील शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष गोखले यांनी आपली आई कै.पंचगंगा यशवंत गोखले यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी सभागृह बांधून दिला आहे. या सभागृहाचा लोकार्पण सोहळा २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

0 Comments

‘स्वर्णिम कोकण’कडून व्हीलचेअर प्रदान

स्वर्णिम कोकण सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेने तुळस गावातील जकातनाका येथील दिव्यांग युवक सागर सुनिल तुळसकर याला व्हीलचेअर प्रदान केली आहे. यावेळी स्वर्णिम कोकणचे अध्यक्ष सूर्यकांत गोळम, सचिव यासीर मकानदार, सरपंच रश्मी परब, जि.प.सदस्य सुजाता पडवळ, सामाजिक कार्यकर्ते वैभव होडावडेकर, विक्रांत चुडजी, निलेश नागवेकर,…

0 Comments

सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचा ‘पालक दिन’ उत्साहात

पालकांचे प्रेम, त्याग, संस्कार आणि मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीत असलेले अनमोल योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने सिद्धिविनायक हॉल येथे घेण्यात आलेला ‘पालक दिन’ उपक्रम उत्साहपूर्ण, आनंदी आणि कौटुंबिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील…

0 Comments

“माझी माहेरची वाट” पुस्तकाचे प्रकाशन

ज्येष्ठ साहित्यिका सौ.अंजली प्रभाकर पार्टे (पूर्वाश्रमीची निभा कृष्णराव घाडी) यांनी लिहिलेल्या "माझी माहेरची वाट" या पुस्तकाचे प्रकाशन अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मुलाच्या निवासस्थानी आषाढी एकदाशीच्या मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंब उपस्थित होते. सौ.अंजली पार्टे या पंढरपूर यात्रेला गेल्या होत्या. तिथे त्यांना आलेले…

0 Comments

युवा महोत्सवात व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजची दमदार कामगिरी

       मुंबई विद्यापीठाचा ५९वा आंतर महाविद्यालयीन 'युवा महोत्सव २०२६-२७' ८ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात संपन्न झाला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३३ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. या सर्वांमध्ये कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी…

0 Comments

रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेलमध्ये मदर तेरेसा स्कुल प्रथम

वेंगुर्ला न.प.मार्फत २९ जुलै रोजी स्वामी विवेकानंद सभागृहात "माझी वसुंधरा अभियान ७.०० व स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत "रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल तयार करणे" ही उपक्रमवजा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शहरातील (आठवी ते दहावी गट) हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी विविध ९ मॉडेल बनविले. यात मदर तेरेसा…

0 Comments

 न.प.च्या सभेत विविध ठराव

वेंगुर्ला न.प.ची मासिक सभा नुकतीच नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी आणि सर्व खात्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. पालिकेवर आता लोकनियुक्त प्रतिनिधींची सत्ता आहे, याचे भान प्रशासनाने ठेवावे. कौन्सिल सभेत जे विषय मांडले जातात ते जनतेशी निगडीत असतात. त्यामुळे सभेत होणाऱ्या ठरावांबाबत प्रशासनाने गंभीर असायला…

0 Comments

आजी-माजी शिक्षकांच्या उपस्थितीत गुरूपौर्णिमा

   आजी-माजी शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका स्कूल वेंगुर्ला शाळा नं.१च्या माजी विद्यार्थ्यांनी २९ जुलै रोजी गुरूपौर्णिमा साजरी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपिठावर निवृत्त केंद्रप्रमुख वि.म.पेडणेकर, शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आबा खोत, राजेंद्र बेहरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा शाळेचे माजी विद्यार्थी अभिषेक…

0 Comments