माजी विद्यार्थी प्रसन्ना देसाई यांच्याकडून पुस्तकांची भेट

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास जेईई आणि नीट परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. हा कार्यक्रम ११ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या पुस्तकांमुळे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार…

0 Comments

संगणक शिक्षकाचे एक वर्षाचे मानधन आगाऊ अदा 

ज्ञानदा विकास संस्थेच्यावतीने संगणक शिक्षकाचे सुमारे एका वर्षाचे मानधन आगाऊ देऊन विद्यार्थ्यांची असलेली संगणक शिक्षकाविना होणारी गैरसोय दूर केली आहे. संस्थेने केलेल्या या सहकार्याबद्दल शिक्षकांसह पालकांनीही संस्थेचे आभार मानले. दाभोली शाळा क्र.१ या शाळेमध्ये संगणक यंत्रणा कार्यरत आहे. परंतु, संबंधित शिक्षकाच्या मानधनाअभावी संगणक…

0 Comments

रानभाज्या स्पर्धेत जाई नाईक प्रथम

माझा वेंगुर्ला, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहर स्तर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ अंतर्गत रानभाजी पाककृती स्पर्धा ६ सप्टेंबर रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालयात संपन्न झाली. रानभाज्या हा कोकणच्या मातीचा, निसर्गाचा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा…

0 Comments

नमो उद्यानामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल – पालकमंत्री

केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेस नमो उद्यान विकासासाठी रुपये १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार कॅम्प-भटवाडी येथील नगरपरिषद मालकीच्या जागेवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. उद्यानात नागरिक व पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, बैठकीची व्यवस्था, योग व…

0 Comments

५२ वर्षांची अखंड सेवा : आबा साळुंखे यांचा वेंगुर्ल्यात गौरव

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेली ५२ वर्षे वेंगुर्ला शहरात येऊन भजनी मंडळांना दर्जेदार वाद्ये उपलब्ध करून देणारे सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील खरसुंडी या गावातील वसंत उर्फ आबा साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांचा वेंगुर्ल्यातील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्यावतीने गौरव करण्यात आला. माणिकचौक विठ्ठल मंदिरात १ सप्टेंबर रोजी…

0 Comments

वेंगुर्ल्यात मोफत बाह्यरूग्ण तपासणी

आरोग्याबाबत वेंगुर्ल्यातील नागरिकांनी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून एस.एस.पी.एम.मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्यातर्फे वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात मोफत बाह्यरूग्ण विभाग सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत…

0 Comments

भूमिहीन, बेघर लाभार्थ्यांना घरकुल

          वेंगुर्ला न.प.ची सर्वसाधारण सभा २७ ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, सर्व खात्यांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. शहरातील ज्या नागरिकांकडे स्वत:ची जमीन नाही, पक्के घर नाही तसेच बेघर…

0 Comments

देवजी ट्रस्टतर्फे विद्यार्थी गुणगौरव

 शालेय विद्यार्थी व युवा वर्गाच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन झालेल्या लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उभादांडा येथील केपादेवी शाळा नं. ४ मध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष दिलीप गिरप, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे सचिव तथा पत्रकार महेंद्र मातोंडकर, ज्येष्ठ कीर्तनकार सावळाराम कुर्ले, सामाजिक…

0 Comments

बँकेचा ग्राहक संपर्क कार्यक्रम संपन्न

     बँक ऑफ महाराष्ट्र वेंगुर्ला, आजगाव, दोडामार्ग, रेडी, बांदा आणि सावंतवाडी या सहा शाखांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक संपर्क कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, वाणिज्य विभागाच्या प्रा. प्रियांका प्रभू आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल कार्यालयातील सामान्य प्रशासन…

0 Comments

संशोधन क्षेत्रात बॅ.खर्डेकर महाविद्यालयाची मोठी भरारी

संशोधन क्षेत्रात बॅ.खर्डेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, डॉ. वसंतराव पाटोळे आणि विद्यार्थी संशोधक मनीष गोस्वामी यांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेल्या ‘मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर’ या नाविन्यपूर्ण डिझाइनला केंद्र सरकारकडून अधिकृत डिझाइन नोंदणी मिळाली आहे. पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेड मार्क्स…

0 Comments