नववर्षानिमित्त काढलेली स्वागतयात्रा ठरली लक्षवेधी
पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजर आणि ढोल ताशे, सनई यांच्या निनादात वेंगुर्ला शहरात हिदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आज काढण्यात आलेली स्वागतयात्रा लक्षवेधी ठरली. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिदू धर्माभिमानी मंडळी यांनी वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रेचे आयोजन केले होते.…
