अमृत कलश यात्रेने माती संकलीत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश‘ अर्थात ‘माझी माती माझा देश‘ या अभियानाच्या दुस-या टप्प्यात ‘अमृत कलश यात्रा‘ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत १५ सप्टेंबर रोजी ढोल ताशांच्या गजरात ‘अमृत कलश यात्रा‘ काढण्यात आली. तत्पूर्वी या यात्रेचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते नगरपरिषद…
