तूर्तास दोन दिवस पशुवैद्यकीय अधिकारी देणार

वेतोरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने पंचक्रोशितील पशुपालक शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. तर गुरांचे प्रतिबंधक लसिकरण होत नसल्याने गुरांना वेगवेगळे आजार होऊन ती दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत आडेली जिल्हा परिषद मतदार…

0 Comments

सोनचिरैया शहर उपजिविका केंद्राची स्थापना

महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिकरणी शहर स्तर संघ यांच्या माध्यमातून नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये ‘सोनचिरैया शहर उपजिविका केंद्र, वेंगुर्ला‘ची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मुख्याधिकारी…

0 Comments

जिम्नॅस्टिक्समध्ये ठाकरे संकुलाचे यश

पुणे-बालेवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील प्रसाद सालप (सुवर्ण व रौप्य), देवांश अमुला (सुवर्ण), जीत चव्हाण (सुवर्ण व रौप्य), जश पारीख (३ सुवर्ण व ३ रौप्य), अलिशा चौधरी (सुवर्ण व रौप्य), मुग्धा मोरे (सुवर्ण), टियाना क्रास्टो (सुवर्ण), अवंती…

0 Comments

तुळस येथे बालकुमार मराठी साहित्य संमेलन

वेंगुर्ला तालुक्याला समृद्ध असा साहित्यिक वारसा लाभलेला आहे. हा तेजस्वी वारसा उगवत्या पिढीच्या उमलत्या बुद्धीला समजावून दिला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड व ललित साहित्याविषयीची अभिरूची निर्माण व्हावी, मुलांनी अवांतर वाचन करावे, नामवंत साहित्यिकांशी मुलांची भेट घडवून आणावी या उद्देशाने आनंदायात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्लातर्फे…

0 Comments

पर्यटन विकासाच्या उच्चस्तरीय समितीमध्ये सतीश लळीत यांची निवड

केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन २.० योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी डेस्टिनेशन मॅनेजमेंट कमिटी (डिएमसी)ची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या १७ सदस्यांच्या उच्चस्तरीय समितीमध्ये १४ शासकीय अधिकारी असून त्यात अशासकीय सदस्य म्हणून कातळशिल्प संशोधक सतीश लळीत, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष…

0 Comments

   अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेच्यावतीने वेंगुर्ला-पेंडूर, पेंढ­याचीवाडी या प्राथमिक शाळेत मुलांसाठी ‘अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!‘ हा मालवण कथामालेचा कार्यक्रम संपन्न झाला. गोष्टी, गप्पा, गाणी, अभिनय गीत प्रबोध, परिकथा, ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा आदींचे सादरीकरण मुलांसमोर करण्यात आले. यात कथामालेच्यावतीने सुरेश ठाकूर,…

0 Comments

चित्तथरारक समई नृत्याचा आविष्कार

भांडुप पश्चिमेच्या कोकण नगरातील स्व.अटल बिहारी वाजपेयी मैदानावर कोकण महोत्सवाचे मुख्य आयोजक सुजय धुरत व दिलीप हिरनाईक चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली २६व्या  कोकण महोत्सवात मुंबई भांडुपमध्ये प्रथमच देवगड येथील नाद-भोळेवाडी गावातील महिलांना समई नृत्य करण्याची संधी मिळाली. अंगणवाडी सेविका रसिका पाष्टे, मेघा पाष्टे, प्रगती…

0 Comments

‘मोबाईल माझा गुरू‘ बालकथासंग्रहाचे प्रकाशन!

नागेश शेवाळकर लिखित ‘मोबाईल माझा गुरू‘ या बालकथा संग्रहाचे प्रकाशन आजरा येथे सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते झाले. बालकांसाठी होणारा मोबाईलचा अतिरिक्त वापर हा भविष्यात धोकादायक ठरू शकतो असे त्यांनी सांगितले. यावेळी सुभाष विभुते, सुनील सुतार, प्रकाश ठाणेकर तसेच पुष्पलता घोळसे आदी…

0 Comments

‘चिवचिव गाणी‘ या पुस्तकाचे प्रकाशन

 साने गुरूजी कथामाला प्रकाशनतर्फे पूज्य साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक रमेश सावंत यांच्या ‘चिवचिव गाणी‘या पुस्तकाचे प्रकाशन १२ डिसेंबर रोजी साने गुरुजी विद्यालय, दादर-मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर, साने गुरुजी कथामाला, वरळीचे उपाध्यक्ष रमेश वरळीकर,…

0 Comments

पवार यांच्या वाढदिनी खेळाचे साहित्य वितरीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला राष्ट्रवादीतर्फे प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांच्यावतीने कुबलवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळेतील अंगणवाडीच्या मुलांना खेळाचे साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कुबल, वेंगुर्ला शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, सचिव स्वप्निल रावळ, नितेश कुडतरकर,…

0 Comments