जबरदस्ततर्फे मुलांची मोफत नेत्र तपासणी

जबरदस्त सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ राऊळवाडा व एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शाळा नं.१, वेंगुर्ला शाळा नं.४, शिवाजी प्रागतिक शाळा व परबवाडा शाळा नं.१ मधील पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.       डॉ.संजय जोशी, डॉ.विकास लुडबे, डॉ.गौरव गुरव, डॉ.विष्णू गोसावी यांनी मुलांची…

0 Comments

प्रशिक्षणातून दर्जेदार कलावंत घडतील-भालचंद्र केळुसकर

 दशावतार कला जोपासण्यासाठीची तपश्‍चर्या असामान्य आहे. दशावतार प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे. अशाच प्रशिक्षण शिबिरांमधून निश्‍चितच दशावतार कलेला वारसा मिळून देणारे दर्जेदार कलावंत घडतील. दशावतार कलेसोबत भजन कलेला राजाश्रय मिळवून द्यायचा असेल तर दशावतार आणि भजनी कलावंतांनी संघटित होण्याची गरज…

0 Comments

ब्राह्मण कलाकारांच्या नाट्यप्रयोगाला उदंड प्रतिसाद

श्री रामेश्‍वर देवस्थान ट्रस्ट आणि वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळातर्फे 15 ऑगस्ट रोजी रामेश्‍वर मंदिरात दशावतारातील नामांकित ब्राह्मण कलाकारांच्या संचात ‘मंगलमूर्ती मंगलेश्‍वर‘ हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर झाला. यात दिनेश जोशी, शेखर काकतकर, देवदत्त गोखले, आबा बर्वे, संजय काळे, दिनेश गोरे, नितीन फडके, दयानंद…

0 Comments

तुळस गावात आढळला अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप

  वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात 2021 मध्ये  सर्पमित्र श्री. महेश राऊळ यांना अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेक आढळला होता. दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्यांना अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेक आढळून आला. 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी तुळस-चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांनी सर्पमित्र महेश राऊळ…

0 Comments

शहरात भव्य तिरंगा रॅली संपन्न

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरात वेंगुर्ला हायस्कूल, हॉस्पिटल नाका, नगरपरिषद कार्यालय, बाजारपेठ, दाभोली नाका, शिरोडा नाका, रामेश्‍वर मंदिर, पॉवर हाऊस, घोडेबांव गार्डन पर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, वेंगुर्ला हायस्कूल व बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच…

0 Comments

स्वातंत्र्य सेनानींच्या वारसदारांचा गौरव

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीवर तसेच शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलस्त्रोत निशाण तलाव येथे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्य सेनानी कै. गणेश महादेव गुरव यांचा मुलगा विजय गणेश गुरव यांचा सपत्नीक तसेच कै.…

0 Comments

नगरपरिषदेतर्फे शिलाफलकाचे अनावरण

‘मातृभूमीला नमन वीरांना वंदन‘ अंतर्गत देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये 14 ऑगस्ट रोजी शिलाफलकाचे अनावरण मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते आणि स्वातंत्र्य सेनानी यांचे वारसदार विजय गुरव व विलास पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाला दिलीप गिरप, बाळू देसाई,…

0 Comments

तृणधान्य, कडधान्य व रानभाज्यांच प्रदर्शन

शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्य, कडधान्य व रानभाज्यांची ओळख व्हावी व त्यांचे गुण समजावेत यासाठी उभादांडा नवाबाग शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले. यात भारंगी, पेवा, टाकळा, रानउडीद, तेरं, घोटवेल, दिडा, लाजाळू, गुळवेल, फागलं, भूईआवळा, कुरडू, एकपान या रानभाज्या तर नाचणी, बाजरी, ज्वारी, वरी आदी तृणधान्यांसहीत काही…

0 Comments

काव्यवाचनाने उपस्थितांची मने केली चिब

क्रांतीदिनाचे औचित्य साधून मठ येथील डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूलमध्ये निसर्गकवी ना.धों.महानोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या ‘मन चिब पावसाळी‘ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उपस्थितांना काव्यवाचनात चिब भिजून टाकले. प्रसिद्ध कवी विठ्ठल कदम आणि मनोहर परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मठ केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव आव्हाड यांनी…

0 Comments

विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टींत गुरफटू नये

भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील दहावी-बारावीतील ११६ गुणवंत विद्यार्थ्यांचा व शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मिळून २० मुख्याध्यापकांचा स्वामिनी मंडपम येथे कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या…

0 Comments