►आसोली येथे आढळला कोरोना बाधित रुग्ण : ३०० मीटरचा परिसर कंटेंनमेंट झोन

वेंगुर्ला तालुक्यातील आसोली-फणसखोल येथे मुंबई वरुन आलेला व होमक्वारंटाईन असलेला व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यामुळे पुन्हा एकदा शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे. फणसखोल येथील कोरोना बाधित आढळलेला हा व्यक्ती २ जून रोजी १७ सीटर वाहनाने मुंबई वरून आला होता. त्याच्यासोबत मळेवाड येथील ९ तर…

0 Comments

►सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत

     ‘निसर्ग‘ चक्रीवादामुळे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत जाहीर केली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या पंचनाम्यांचे काम सुरु असून एकही नुकसानग्रस्त मदतीपासून…

1 Comment

►भर पावसात सुरु असलेले रस्त्याचे काम थांबविले

वेतोरे ते दाभोली या मुख्य रस्त्याचे काम बरेच दिवस मंजूर होते. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक होते. वाहन चालकांना याचा मोठा त्रास होत असल्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती. दरम्यान आज भर पावसात संबंधित ठेकेदाराने…

0 Comments

►५० शेतक-यांना भातबियाणांचे वाटप

पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला शिवसेना शहरप्रमुख यांच्यामार्फत शहरातील ५० शेतकरी कुटुंबाना भात-बियाणे वाटप करण्यात आले.       यावेळी शहर समन्वयक विवेक आरोलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, सावली आराडकर, गजानन गोलतकर,…

0 Comments

►वेंगुर्ल्यात घरोघरी वटपौर्णिमा साजरी

वेंगुर्ला तालुक्यात ५ जून रोजी ठिकठिकाणी वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आला. काही ठिकाणी वडाच्या झाडाकडे एकत्र येत तर काही ठिकाणी घरोघरी वडाची फांदीचे पूजन करुन महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. कोरोनाचे सावट असले तरी महिलांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण दिसून येत होते.       हिंदू पंचांगातील ज्येष्ठ…

0 Comments

►वादळी वारा व पावसाने नुकसान – ठिकठिकाणी पडली झाडे

अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वेंगुर्ला तालुक्यात २ जूनपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. ३ जून रोजी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून मोठमोठ्या लाटाही किना-याला येऊन धडकत होत्या. सागरेश्वर किनारी धोक्याचा लाल बावटा लावण्यात आला आहे. २ जूनच्या मध्यरात्री पाऊस आणि…

0 Comments

►मातोंड येथे एक कोरोना पॉझिटिव्ह

सिधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यात वेंगुर्ला तालुक्यातील मातोंडमधील एकाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हा व्यक्ती १८ मे ला मुंबईवरुन गावात दाखल झाला होता. येथील एका प्राथमिक शाळेत त्याला संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले होते. यानंतर त्याला काही लक्षणे…

0 Comments

►हापूस आंबा एसटीने पहिल्यांदाच जिल्हयाबाहेर

वेंगुर्ला परिसरातील आंबा बागायतदारांचा आंबा एसटीच्या माध्यमातून नाशिकच्या पंचवटी बाजारपेठेत रवाना झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एस टी ची आंबा वाहतुक सेवा सुरु केली आहे. बागेतुन काढलेला आंबा थेट बागेतून एसटी बसने बाजारपेठेमध्ये नेला जात असल्याने या वाहतुकीला…

0 Comments

►वेंगुर्ल्यातील ११८ मजूर उत्तर प्रदेशला जाण्यासाठी रवाना

वेंगुर्ला तालुक्यातून तहसीलदार यांच्याकडे नाव नोंदलेल्या ११८ मजुरांना ६ गाड्यातून उत्तर प्रदेशाला जाण्यासाठी वेंगुर्ला बस स्थानकातून पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ओरोस रेल्वे स्थानकावर मार्गस्थ करण्यात आले.     वेंगुर्ला तालुक्यातील या सर्व मजुरांना ते असलेल्या ठिकाणाहून बसमधून वेंगुर्ला एस.टी.स्थानकावर आणण्यात आले. त्याठिकाणी वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयातील…

0 Comments

►तुळस येथे १० फुट उंचीचे मिरची झाड

कोणतेही रासायनीक खत न वापरता तुळस येथील मधुकर तेंडुलकर यांनी आपल्या परसबागेत १० फुट उंचीचे मिरचीचे झाड वाढविले आहे. या झाडाला सुमारे ७ ते ८ किलो मिरच्या लागल्या आहेत. रस्त्यालगतच हे झाड असल्याने येणा-या जाणा-यांचे लक्ष वेधुन घेत आहेत.       तुळस-सावंतवाडा येथील रहिवासी…

0 Comments
Close Menu