भीमगीतांच्या समुहगायन स्पर्धेत प्रज्ञासूर्य आसोली प्रथम
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी शाखा वेंगुर्ला आणि भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यामान वेंगुर्ला हायस्कूलच्या सभागृहात घेतलेल्या ‘होता तो भीम माझा‘ भीमगीतांच्या समुहगायन स्पर्धेत आसोली येथील प्रज्ञासूर्य ग्रुपने प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे उद्घाटन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिधुदुर्गचे महासचिव किशोर कदम व फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच…