►पालकमंत्री राणेंकडून “रिटर्न गिफ्ट”

मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट दिली आहे. ओसरगाव टोेलबाबत जिल्ह्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओसरगाव टोलनाक्यावर एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत तसेच पिवळी नंबर प्लेट असणाऱ्या जिल्ह्यातील व्यावसायिक गाड्यांना ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ओसरगाव टोलच्या मुद्दयावर जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक यांनी टोलमाफीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आपण सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता केली असून वाहनधारकांना कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply