►भटक्या कुत्र्यांचे निर्बीजकरण व लसीकरण

वेंगुर्ला शहरातील भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनेसाठी न.प.तर्फे नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. यात जानेवारी महिन्यात १४३ तर दि.२० ते २७ ऑक्टोबर या कालावधीत १३३ अशा एकूण २७६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजकरण व लसीकरण करण्यात आले. येत्या काही महिन्यांत पुन्हा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply