गाबीत समाजाचा विद्यार्थी गुणगौरव

वेंगुर्ला तालुका गाबित समाज संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा १९ जुलै रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. यावेळी समाजातील दहावी, बारावी व पदवी, पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत अशा एकूण ६० विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इंडिगो विमान कंपनीचे मॅनेजर गणेश…

0 Comments

वेतोरेच्या सातेरी विकास सोसायटीला नाबार्डचा पुरस्कार

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत वेतोरे येथील श्री सातेरी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. वेतोरे या संस्थेला नाबार्डचा नॉन क्रेडिट सव्र्हस (कर्ज वाटपाव्यतिरिक्त इतर व्यवसाय) क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.      आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ आणि नाबार्डच्या…

0 Comments

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ५५ जणांचे रक्तदान

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिधुदुर्ग भाजपातर्फे शिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. तर विशेष निमंत्रित २० रक्तदात्यांना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांना जीवनदाता पुरस्कार देण्यात आला. शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या…

0 Comments

  स्वच्छता कर्मचा-­यांचा सत्कार

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम, राज्यात तृतीय व देशात पंधरावा क्रमांक प्राप्त केला आहे. याची दखल घेऊन उबाठा सेना वेंगुर्लातर्फे न.प.तील स्वच्छता कर्मचा­यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न…

0 Comments

मेंदूतील पाणी नाकाद्वारे गळण्याच्या दुर्मिळ समस्येवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

  डेरवण येथील वालावलकर रूग्णालयातील डॉक्टरांनी स्पॉन्टेनियस सेरेब्रोस्पायनल फ्लूइड रायनोरिया या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराचे निदान करून नुकतेच यशस्वी उपचार केले आहेत.       चिपळूण येथील सुमारे 44 वषय एका महिलेला 15 दिवस सतत नाकातून पाणी गळत होते. सुरूवातीला त्यांनी सदचे लक्षण समजून त्याकडे…

0 Comments

वेंगुर्ला तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

वेंगुर्ला तालुक्यात पुढील कालावधीत होणाया एकूण ३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत तहसीलदार ओंकार ओतारी यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जाहीर केले. पुरूष व महिला यांना समान आरक्षणानुसार वेंगुर्ला तालुक्यात भविष्यात १५ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. नव्या आरक्षणाचा फटका बहुतांश विद्यमान सरपंच…

0 Comments

दिव्यांग महिलांच्या निबंध स्पर्धेत कल्पना दबडे प्रथम

             वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी कहाणी-माझा आत्मसन्मान‘ या विषयावर दिव्यांग महिलांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सांगली येथील कल्पना उत्तम दबडे यांनी प्रथम क्रमांक  पटकाविला. या…

0 Comments

गुरूपौर्णिमेला मुलांकडून आईची पाद्यपूजा

  गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून विद्याभारती संचलित वेतोरे येथील ज्ञानदा शिशूवाटिकेतील मुलांनी आपल्या आईची पाद्यपूजा करून अनोखी गुरूपौर्णिमा साजरी केली. शिशूवाटिकेच्या संचालिका कांचन दामले यांनी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी आपले चालीरीती, परंपरा या घरातच कसे जपावे याचे मार्गदर्शन केले.

0 Comments

गुरूपौर्णिमेनिमित्त शिक्षकांना केले अभिवादन

वेंगुर्ला तालुकास्कूलचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन शालेय जीवनात शिक्षक म्हणून लाभलेल्या शिक्षकांच्या घरी जात त्यांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना त्यांचे आशीर्वादही घेत आहेत. यावर्षी आबा खोत, मेघा पाटकर, मोहिनी पेडणेकर, वि.म.पेडणेकर, राजेंद्र बेहरे, आनंद पेडणेकर या शिक्षकांच्या निवासस्थानी जात त्यांना अभिवादन करीत त्यांचे आशीर्वाद…

0 Comments

भाजपातर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूजनांचा विशेष सत्कार

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवणा­या आणि निष्ठापूर्वक कार्य करणारे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तथा संघाचे स्वयंसेवक अनंत आठले गुरूजी तसेच डॉ.वामन कशाळीकर यांचा वेंगुर्ला भाजपाच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन कृतज्ञता व्यक्त करीत विशेष सत्कार करण्यात आला.      यावेळी भाजपाचे सुहास गवंडळकर, रवी शिरसाठ,…

0 Comments