राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणे हीच खरी गुरूदक्षिणा!-कदम

भगवंत आणि गुरूतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणा­यांवरच असतो, हेच इतिहास सांगतो. आज ही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक असून  राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणे हीच खरी गुरूपौर्णिमेला गुरूंसाठी…

0 Comments

‘फरा‘ प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी कै. फटीराव रामचंद्र देसाई अर्थात ‘फरा‘ प्रतिष्ठानचा दशावतारी गुरूपौर्णिमा उत्सव वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार दिलीप देसाई, प्रसिद्ध चित्रकार आनंद ठोंबरे, फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.    …

0 Comments

सिधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ले ‘युनेस्को‘च्या वारसा स्थळांच्या यादीत

    संपूर्ण देशवासीयांचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले १२ किल्ले हे युनस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य‘ म्हणून त्यांचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ११ किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा,…

0 Comments

वेंगुर्ले ग्राहक पंचायत अध्यक्षपदी आनंद बांदेकर

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून डॉ. आनंद प्रभाकर बांदेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वेंगुर्ले रामघाट येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सीताराम उर्फ दादा…

0 Comments

भाजपाच्या वतीने ‌‘सन्मान वारकऱ्यांचा‌’ कार्यक्रम : वेंगुर्ल्यात 25 जेष्ठ वारकऱ्यांचा सत्कार

वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनातील अनमोल परंपरा आहे. ‌‘वारी‌’ ही श्रद्धा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी चळवळ आहे. ही परंपरा केवळ देवाच्या दर्शनापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. याच परंपरेच्या सन्मानार्थ भारतीय जनता पाट  सिंधुदुर्ग यांच्या वतीने…

0 Comments

पिंपळाच्या पानावर साकारला पंढरीचा विठूराया

      आषाढी एकादशीचे औचित्य साधून दाभोली येथील कु. मयंक विनायक दाभोलकर याने पिंपळाच्या पानावर विविध रंगाच्या सहाय्याने पंढरीचा विठूराया साकारला आहे. त्याच्या कलेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कु. मयंक हा दाभोली इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्याथ आहे. तो उत्कृष्ट हार्मोनियम वादक…

0 Comments

संसार सुफळ झाला गे माये देखियले पाय विठोबाचे!

       खांद्यावर भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर, मुखात पांडुरंगाचे नाव घेत विठ्ठल भक्तांनी वारकरी पेहरावात काढलेल्या वेंगुर्ला ते कालवी बंदर या आषाढी पायी वारीला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‌‘पाहूं द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळां माझ्या‌‘ अशी अवस्था झालेल्या…

0 Comments

सीमा मराठे सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्काराने सन्मानित

माध्यमस्वातंत्र्याची गळचेपी होण्याच्या आजच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरेच आहे का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर टीका केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील विविध पुरस्कार…

0 Comments

स्वच्छ सिधुदुर्ग घोषवाक्य स्पर्धेत दाभोली येथील विलास हरमलकर प्रथम

पर्यटनदृष्ट्या विकसित असलेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निवांता हॉस्पिटॅलिटीतर्फे ‘स्वच्छ सिधुदुर्ग घोषवाक्य‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात वेंगुर्ला-दाभोली येथील विलास हरमलकर यांनी प्रथम, साळगांव येथील प्रेरणा घाग हिने द्वितीय तर मडगांव-गोवा येथील तनुजा सगरे हिने तृतीय क्रमांक  पटकाविला आहे. विजेत्या…

0 Comments

पटसंख्येचा निकष रद्द करून माध्यमिक शाळा वाचवा!

दुर्दैवाने प्राथमिक शाळांपाठोपाठ आता पटसंख्येचे निकष पुढे करून मराठी माध्यमाच्या शासकीय माध्यमिक शाळाही बंद पडण्याचा घाट घातला जात आहे. शिक्षण विभागाकडून अनेक शाळांना तशा नोटिसा गेल्यामुळे या शाळांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. मराठी शाळा बंद पडल्या तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम मराठी भाषेवर…

0 Comments