साबळेंच्या कारवाईबाबत जल्लोष

सांगली-मिरज महानगरपालिकेचे उपयुक्त वैभव साबळे यांना लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच अटक केली. त्यांच्यावर शहरातील २४ मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच मागून ७ लाखांवर तडजोड केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान या कारवाईचे पडसाद वेंगुर्ला शहरातही उमटले आहेत. वेंगुर्ला शहरात काही नागरिक, व्यापारी…

0 Comments

हिदुधर्माभिमानींतर्फे शिवराज्यभिषेक दिन साजरा

  हिदुधर्माभिमानी मंडळींच्यावतीने वेंगुर्ला - माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच शिवप्रार्थना म्हणुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.      यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले. तसेच कु.शिवानी खानोलकर हिने शिवराज्यभिषेक दिनाचे महत्व विषद केले. हिदू साम्राज्यदिनाची महती सांगताना बाबुराव…

0 Comments

मैदानावर वृक्षारोपणासाठी निवेदन

वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर क्रिकेटसह अन्य मैदानी स्पर्धा हत असतात. मात्र, मैदानावर झाडांच्या सावली अभावी खेळाडूंना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मैदानाच्या सभोवताली वृक्ष लागवड केल्यास त्याचा फायदा खेळाडूंना होणार आहे. संबंधित वृक्ष लागवड करण्यासाठी नगरपरिषदेने आम्हाला परवानगी द्यावी आणि सहकार्य करावे अशाप्रकारचे निवेदन…

0 Comments

आंतरराष्ट्रीय सागरदिनी स्वच्छता मोहिम

आंतरराष्ट्रीय सागरी दिनाचे औचित्य साधून उभादांडा येथील श्री क्षेत्र सागरेश्वर किना-­याची स्वच्छता करण्यात आली. यात विविध प्रकारचा सुमारे ५०० किलो कच­याचे संकलन केले. ही स्वच्छता मोहिम कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग, महाराष्ट्र जीन बँक, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ-नागपूर यांच्यावतीने  ८…

0 Comments

वनपरिमंडळमध्ये सुरंगी रोपवनाची लागवड

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुडाळ वनपरिक्षेत्रातील मठ वनपरिमंडळमध्ये वन कक्ष क्रमांक १३६ मध्ये सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, मठ सरपंच रूपाली नाईक, प्रा.धनश्री पाटील यांच्या हस्ते सुरंगी रोपवन लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात सावंतवाडी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ…

0 Comments

पर्यावरणदिनी कासवमित्रांचा सन्मान

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा किसान मोर्चा-सिधुदुर्गतर्फे कासव संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणा-­या वायंगणी येथील सहा कासवमित्रांचा सन्मान करण्यात आला. यात सुहास तोरसकर, प्रकाश  साळगांवकर, संतोष साळगांवकर, गौरेश खडपकर, चंद्रशेखर तोरसकर, प्रकाश सागवेकर या कासवमित्रांचा समावेश आहे.      कासवमित्रांच्या परिश्रमांमुळे जैवविविधतेचे संरक्षण शक्य…

0 Comments

महिला सक्षमीकरण प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी येथे महिला सक्षमीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला प्रतिनिधींच्या नेतृत्ववृद्धीसाठी ‘विलीड‘ उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग डायोसिजन विकास संस्था सावंतवाडी, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, समता प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, सामाजिक संवेदना आजरा, दिशा सामाजिक संस्था चंदगड आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सावंतवाडी-नवसरणी येथे…

0 Comments

जैतिर उत्सवाची कवळासाने सांगता

तुळस गावात गेले दहा दिवस सुरू असलेल्या प्रसिद्ध जैतिर उत्सवाची सांगता उत्सवाच्या अकराव्या दिवशी बुधवारी कवळासाने झाली. पावसाने विश्रांती घेतल्याने पंचक्रोशीसह विविध ठिकाणच्या भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत या उत्सवाचा आनंद लुटला. नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेला वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचा जैतिर उत्सव…

0 Comments

निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजपातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना भाजपा महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील विजेते अनिकेत कुंडगीर (प्रथम), विद्या परब (द्वितीय) यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच उन्नत्ती खांडेकर, जानव्ही कांबळी, वैभवी चिपकर, साक्षी मांजरेकर, सुरेखा…

0 Comments

शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने ‘नगरसभा‘ घ्यावी

वेंगुर्ला नगरपरिषदेवर प्रशासकाचे नियंत्रण नसल्यामुळे शहरातील विकासकामांची वाताहत झाली आहे. नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. तरीही शहरवासीयांचे असंख्य प्रश्न कधीच सुटत नाहीत. ग्रामीण भागातील जनतेला आपले प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसभा हे हक्काचे व्यासपीठ असते. त्याच धर्तीवर नगरपरिषद, नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी शासनाने नगरसभा घ्यावी अशा…

0 Comments