नागोबा आणि पंगा-याच्या पानातले पातेाळे….
अंगणात हिरव्यागार उगवलेल्या टायकाळ्यावर भिरभिरणा-या पिवळ्या फुलपाखरांच्या मागे पळत असताना नजर मात्र आईच्या वाटेकडे लागली होती. एवढ्यात चार घरची भांडीकुंडी करुन दुपारच्या वेळी आई लगबगीने घरी येताना दिसली. भिंगरीला दो-याने बांधून तीचे हॅलीकॉप्टर घेऊन ती तसाच आईच्या दिशेन झेपावलो. आईला बिलगून बोललो “आये…
