नीटच्या परीक्षेला पुन्हा सामोरे जाणाऱ्यांसाठी
गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे तुमच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता, चीड आणि संताप अत्यंत स्वाभाविक आहे. दोन ते चार वर्षे अहोरात्र घेतलेली मेहनत, पाहिलेली स्वप्ने अचानक एका अनिश्चिततेच्या गर्तेत सापडल्यासारखी वाटत असेल. तुम्ही स्वतःला एका ‘चक्रव्यूहात’ अडकल्यासारखे अनुभवत आहात, हे मी समजू शकतो.…
