अनिल सौदागर, मंदाकिनी सामंत पुरस्काराने सन्मानीत

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष, वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे बरीच वर्षे अध्यक्षपद भुषविलेले व गेली 30 वर्षे जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारीणीवर काम करीत असलेले, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था संस्थापक असलेले व 12 वर्षे अध्यक्षपद भुषविणारे, सिंधुदुर्ग जिल्हा कंन्झ्युमर डिस्ट्रीक असोसिएशनचे…

0 Comments

जीआयझेड संस्थेच्या प्रो सॉईल प्रकल्पांतर्गत वेंगुर्ला नगर परिषदेच्या कंपोस्ट प्रकल्पाला भेट

जी आय झेड ही जर्मन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी चालवली जाणारी संस्था आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाद्वारे शहरे स्वच्छ करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. याचाच एक भाग म्हणून जीआयझेड या संस्थेमार्फत कंपोस्टिंग या विषयात सहकार्य केले जाते.       या…

0 Comments

‘व्यापारी एकता मेळावा’ उत्साहात संपन्न : जिल्हाभरातून उत्स्फू र्त प्रतिसाद

जिल्ह्यातील आणि तालुक्यातील मेळावा असल्याने त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या हाकेला मी याठिकाणी आलो आहे. सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. सिंधुदुर्गाचे नाव सर्वत्र आहे. पण व्यापाराच्या दृष्टीने सिंधुदुर्गचे नाव समृद्ध होत आहे असे वाटत नाही. माझा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापाराच्या बाबतीतसुद्धा समृद्ध व्हावा, त्रुटी सोडविण्यासाठी…

0 Comments

पेोंभुर्ल्यात कौटुंबिक स्नेहमेळावा संपन्न

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज जांभेकर कुटुंबिय यांनी 21 व 22 जानेवारी रोजी कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. अवघे 35 वर्ष वय लाभलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक पहाण्यासोबतच सुधाकर जांभेकर व त्यांचे चिरंजीव बाजीराव व विक्रम जांभेकर यांनी…

0 Comments

तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न

         लेखक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवविश्‍वातून विशिष्ट अनुभव प्रतिभानवित करून व्यक्त करीत असतो. जीवन जगत असताना विविध अनुभवांना सामोरे जात असताना एखाद्या तरल क्षणी संभाव्य कथाबीजाची निर्मिती होते. कथाबीजापासून संपूर्ण कथानिर्मितीचा प्रवास हा दीर्घ असतो. त्यात अनेक टप्पे असतात. कथा निर्मिती…

0 Comments

आनंदयात्री वाङ्मय मंडळाची वि. स. खांडेकर स्मारकाला भेट

     मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने शिरोडा येथील वि. स. खांडेकरांच्या स्मारकाला भेट दिली. याचेच औचित्य साधून संस्थेच्या ऑफिसमध्ये वि. स. खांडेकरांच्या साहित्यावर एक छोटेखानी कार्यक्रम झाला. कौलापुरे  यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. साहित्यिक वृंदा कांबळी यांचा संस्थेच्या वतीने…

0 Comments

आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन संपन्न

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापनदिन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केट इमारतीवरील राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी बॅ. खर्डेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून संचलनही करण्यात आले. वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. यात नगरपरिषदेचे…

0 Comments

उभादांडा येथे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार संपन्न

राजकारण, समाजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिचा उभादांडा येथील प.पू.आई नरसुले समाधी मंदिरात व्यवस्थापक ह.भ.प.मोहनदास नरसुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी आमदार नारायण महादेव चमणकर यांचे नातू तथा उभादांडा गावचे विद्यमान सरपंच निलेश जयप्रकाश चमणकर, उपसरपंच टिना कार्मिस आल्मेडा, सामाजिक…

0 Comments

दिव्यांग केंद्रासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज

सावंतवाडी-सालईवाडा येथे साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र,सावंतवाडी या केंद्राचा वर्धापनदिन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाने संपन्न झाला. उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघ सहसचिव सुधीर धुमे यांनी केले. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी व साहस प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त…

0 Comments

आरती कार्लेकर स्वेच्छानिवृत्त

  बँक ऑफ इंडियाच्या वेंगुर्ला शाखेमधील व्यवस्थापकीय अधिकारी श्रीमती आरती संजय कार्लेकर यांनी ३७ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्ती घेतली. यानिमित्त ३१ जानेवारी रोजी रत्नागिरी झोनल मॅनेजर संतोष सावंत-देसाई, ऑफिसर असोसिएशनचे ऋषिकेश गावडे, माजी वरिष्ठ प्रबंधक नंदकुमार प्रभूदेसाई आणि श्री.केरकर, तसेच वेंगुर्ला शाखेचे वरिष्ठ…

0 Comments