कोजागिरीला ‘चांदणझुला‘ ठरले संस्मरणीय
प्रसिद्ध लेखिका वृंदा कांबळी यांच्या आयोजनाखाली कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे ‘चांदणझुला‘ कवी संमेलन साई मंगल कार्यालयात पार पडले. साहित्य कोणतेही असो, कथा-कविता-कादंबरी ते समाजहिताचा विचार करूनच लिहिलेले असावे. त्यात उद्बोधनही असावे. सामाजिक विचारांना कवितेत महत्त्व असावे असे मार्गदर्शन सावंतवाडीतील निवृत्त…
