प्रशासकीय दिरंगाईमुळे कर्मचारी वाऱ्यावर!
महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा रथ ज्या चाकांवर स्वार होऊन ग्रामीण भागातील शेवटच्या शाळेपर्यंत पोहोचतो, त्या रथाची चाकेच आज प्रशासकीय दिरंगाईच्या चिखलात रुतली आहेत. 'समग्र शिक्षा योजना बंद, ३,८०० कर्मचारी बेरोजगार' ही केवळ एक बातमी नाही, तर ती गेली १५ वर्षे रक्ताचे पाणी करून…
