वेंगुर्ला येथील तालुका भाजपा कार्यालयात महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेंगुर्ला तालुका महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत ४१ महिला सदस्यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी समिधा कुडाळकर, श्रद्धा धुरी, श्वेता चव्हाण, सरचिटणीसपदी आकांक्षा परब, दिपाली दाभोलकर, चिटणीसपदी प्रार्थना हळदणकर, स्नेहा गोडकर, सिद्धी तावडे, अस्मिता मेस्त्री तर सदस्यपदी मयुरी वडाचेपाटकर, रेश्मा परब, कावेरी गावडे, स्नेहल पालकर, प्रणाली खानोलकर, भाग्यलक्ष्मी घारे, सविता परब, विद्या गोवेकर, राखी धोंड, किरण मातोंडकर तर शहर अध्यक्षपदी श्रेया मयेकर, उपाध्यक्षपदी शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, ईशा मोंडकर, सरचिटणीसपदी पूनम जाधव, रसिका मठकर, चिटणीसपदी वृंदा मोर्डेकर तर सदस्यपदी हसिनाबेगम मकानदार व मानसी परब यांची निवड करण्यात आली. या सर्वांना महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, तालुका अध्यक्षा सुजाता पडवळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.