वेंगुर्ला आगारातून तालुक्यासह लांब पल्ल्याच्या बस फे­-यांना प्रारंभ

राज्य परिवहन वेंगुर्ला आगारातून ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी रेडी-कनयाळ, केळूस, निवती, अणसूरपाल, तुळस, होडावडे, वेतोरे, खानोली, दाभोली मार्गावर सकाळ, संध्याकाळ अशा एकूण ६४ फे-या सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती वेंगुर्ला आगाराचे आगारप्रमुख जी.एस.चव्हाण यांनी दिली आहे.       जिल्ह्याबाहेरील वाहतुकीसाठी वेंगुर्ल्याहून सध्या सकाळी ६.३० वा. रत्नागिरी, ७ वा. अक्कलकोट, ८ वा. पूणे, ८.३५ वा.कोल्हापूर, ११ वा.कोल्हापूर, दुपारी २ वा. कोल्हापूर…

1 Comment

शहरात सर्वानुमते जनता कफ्र्यूचा विचार करावा

सिधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच वेंगुर्ला शहरातही कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण वाढत आहेत. रुग्णवाढ अशीच सुरु राहिल्यास त्यावर उपाययोजना करण्याकरीता डॉक्टरांचा अभाव, ऑक्सिजन व बेडचा तुटवडा या गोष्टींचा विचार करता नगरपरिषदेने सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, व्यापारी, सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी या सर्वांची तातडीने बैठक घेऊन वेंगुर्ला शहरात जनता कफ्र्यू…

0 Comments

कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना ५० लाख रुपयाची मदत मिळावी

राज्यातील पत्रकाराचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकांराना कोरोना योद्धे म्हणून ५० लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे वेंगुर्ला तहसिलदार यांना निवेदन सादर करुन करण्यात आली.       वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के.जी.गावडे, सचिव दाजी नाईक, सहसचिव विनायक वारंग, सदस्य प्रथेमश…

0 Comments

वेंगुर्ल्यात आज २५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (दि.१६) १९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात वेंगुर्ला तालुक्यातील २५ रुग्णांचा समावेश आहे.       आज सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये वेंगुर्ला शहरात २ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील १ आणि वडखोल तुळस येथील १ हे दोन्ही मागील रुग्णांच्या…

0 Comments

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी‘ या मोहिमेचा शुभारंभ

महाराष्ट्र कोविडमुक्त करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याच्या उद्देशाने ‘माझे कुटुंब -माझी जबाबदारी‘ ही मोहीम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील या मोहिमेचा शुभारंभ तुळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समितीचे सभापती अनुश्री कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.       या शुभारंभप्रसंगी पंचायत समिती सदस्य यशवंत…

0 Comments

शहरातील ६५ शिक्षकांचा ‘कोव्हीड योद्धा‘ म्हणून सन्मान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेने शहरातील अधिग्रहीत केलेल्या शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती. त्या शिक्षकांनी उत्कृष्टपणे सेवा बजाविल्या आहेत.त्यांनी केलेल्या उच्चत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने ‘कोव्हीड योद्धा‘ म्हणून वेंगुर्ला शहरातील ६५ शिक्षकांना शाल, श्रीफळ…

0 Comments

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मालमत्तांना विशिष्ट नामकरण

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मालमत्तांना विशेष नामाभिमान नसल्याने ब-याचवेळा एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना त्या विशिष्ट इमारतीला किवा सभागृहाला संबोधणे प्रशासनाला अडचणीचे ठरत होते. त्यामुळे ६ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत या मालमत्तांना विशिष्ट नामकरण करण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, क्रॉफर्ड मार्केट, मानसीश्वर उद्यान आणि घोडेबांव उद्यान यांची नावे न…

0 Comments

‘एक हात मदतीचा‘ अंतर्गत धान्याचे वितरण

कोव्हीड १९च्या महामारीमुळे अनेक वृद्धाश्रम व परप्रांतीय यांची उपासमार झाली होती. अशा गरजूंना धान्य देण्यासाठी ‘‘एक हात मदतीचा‘‘ या संकल्पनेअंतर्गत वजराट गावाच्यावतीने गावातील रेशनिंग कार्ड धारकांना १ किलो धान्य जमा करण्याचे आवाहन श्री गिरेश्वर सोसायटीतर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ३५० कार्डधारकांनी…

0 Comments

वेंगुर्ला मार्केट व्यवस्थापनाबाबत बैठक संपन्न

वेंगुर्ला मार्केट आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्यानंतर प्रशासनाने मार्केट उचलून ती जागा पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात येईल. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा मार्केट सॅनिटाईज केले जाणार असल्याची नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी बैठकीवेळी दिली.       वेंगुर्ला नगरपरिषद मार्केट व्यवस्थापन व शहरात…

0 Comments

विकासकामे न लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन

वेंगुर्ला शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या नगरपरिषदेच्या मच्छिमार्केट सहित इतर रखडलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा विरोधी पक्ष गटनेते महेश डिचोलकर यांनी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना निवेदन दिले. दरम्यान, पुढील २ महिन्यात याबाबत योग्य ती कार्यवाही न…

0 Comments
Close Menu