आनंदयात्रीच्या ‘श्रावणधारा‘ लघू काव्य संग्रहाचे प्रकाशन
सातत्याने साहित्य विषयक उपक्रम घेणा-या वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा स्नेहमेळावा साई दरबार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यात मागील श्रावण महिन्यात आनंदयात्रीतील कवींनी श्रावणातील पावसावर व निसर्गावर केलेल्या विविध कवितांचे संकलन करून आनंदयात्रीच्या ‘श्रावणधारा‘ या लघु काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. पांडुरंग कौलापुरे यांच्या हस्ते झाले.…