►सिंधुदुर्गात ८२ हजार ५४९ मतदार घटले

मतदारयादी पडताळणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सिंधुदुर्गात सुरू असलेल्या सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर) मयत असलेल्या ३६ हजार ६०६, स्थलांरित झालेल्या ३३ हजार ७६२ व अन्य विविध कारणांमुळे तब्बल ८२ हजार ५४९ मतदारांची घट झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या मतदार यादीत असलेल्या एकूण मतदारांची संख्या ६ लाख ८८ हजार १४ वरून ६ लाख ५ हजार ४६५ एवढी खाली आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात २ लाख ३४ हजार ५१९ मतदार होते, त्यातील ३० हजार १४७ मतदार घटले आहेत.
मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमानंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत दावे व हरकती निकाली काढले जाणार आहेत  आणि २७ ऑक्टोबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Leave a Reply