कुक्कुटपालनाला वादळाचा फटका
तौक्ते चक्रीवादळाचा फटका कुक्कुटपालन व्यवसायाला बसला असून मांगरावर पडलेल्या आंब्याच्या झाडामुळे सुमारे १००० कोंबडीची पिल्ले मृत झाली. कोंबड्यांचे खाद्यही वाया गेले असून मांगराचीही पडझड झाल्याने कृष्णा राऊळ यांचे अंदाजित ३ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वेंगुर्ला-राऊळवाडा येथे कृष्णा राऊळ यांचा कुक्कुटपालन व्यवसाय असून…
