गाडीअड्डा येथे चार थर रचत फोडली दहीहंडी

वेंगुर्ला-गाडीअड्डा येथे एकावर एक असे चार थर रचत गोविंदांनी दहीहंडी फोडली. ‘‘गोविंदा रे गोपाळा‘‘ च्या जयघोषात युवाईने जल्लोष केला. नागरिकांनीही येथे उपस्थित राहत गोविंदांना साथ दिली. वेंगुर्ला शहरासह तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वेंगुर्ला सातेरी व्यायाम शाळेतर्फेही दहीहंडी उत्सव साजरा…

0 Comments

वेंगुर्ला तालुकास्कूलमध्ये श्रीकृष्णाचे पूजन

दरवर्षीप्रमाणे गोकुळाष्टमीचे औचित्य साधून तालुकास्कूल वेंगुर्ला शाळा नं.१ येथे  मोठ्या उत्साहात श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णावर आधारीत काही सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते. २७ ऑगस्ट रोजी साकव पुलावर श्रीकृष्णाचे विसर्जन करण्यात आले.

0 Comments

पुस्तकहंडीतून मुलांनी दिला ज्ञानाचा वसा

डिजिटल युगात प्रगतीचे बीज रूजत असताना सोशल मिडियाच्या माध्यमातून विघातक आणि वाईट गोष्टींच्या विळख्यात तरूणांसह लहान मुलेही अडकत आहेत. समाजाकडे मुलांना निकोप आणि प्रगल्भ समाजाभिमुख दृष्टीने पहायला शिकवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वेंगुर्ला येथील मुक्तांगणतर्फे मुलांमध्ये वाचनसंस्कार रूजावा या हेतूने पुस्तकहंडी हा उपक्रम गोकुळाष्टमीचे…

0 Comments

भास्करपंतांची शंभरावी पुण्यतिथी उत्साहात

वेंगुर्ला येथील प.पू.भास्कर पंत वागळे महाराज यांच्या १००व्या  पुण्यतिथी निमित्त शहरात पालखी दिंडी सोहळ्यासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. २४ ऑगस्ट रोजी सकाळी जुना स्टॅण्ड येथील श्री देव गणपती मंदिर येथून पालखी दिडी सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी ढोल पथक आणि लहान…

0 Comments

शिबिरात दीडशे जणांची नेत्र तपासणी

विश्व हिदू परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ला-भटवाडी येथील रवी शिरसाट यांच्या निवासस्थानी २५ ऑगस्ट रोजी घेतलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचा सुमारे दीडशे जणांनी लाभ घेतला. उद्घाटन नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात मुंबईतील नेत्रतज्ज्ञ डॉ.निरव रायचुरा व…

0 Comments

      राधा,कृष्ण वेशभूषा स्पर्धेला प्रतिसाद

कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी पुरस्कृत श्रावण महोत्सवांतर्गत वेंगुर्ला-नगरवाचनालय येथे शिवसेना वेंगुर्ला व शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या राधा, कृष्ण वेशभूषा स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात ४७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. बालवाडी गटामध्ये प्रथम-सार्थक लांजेकर, द्वितीय-प्राप्ती मोरे,…

0 Comments

आसोली हायस्कूल, परबवाडा नं.१ प्रथम

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भाजपाच्यावतीने आयोजित केलेल्या समुहगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धा पुरस्कर्ते भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला हायस्कूल येथे घेण्यात आली. स्पर्धेतील माध्यमिक गटात प्रथम-आसोली हायस्कूल, द्वितीय-सातेरी हायस्कूल वेतोरे, तृतीय-रा.कृ.पाटकर हायस्कूल,…

0 Comments

जाणीव जागृती यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

गेल्या १५ वर्षात सावंतवाडी मतदार संघातील नागरिकांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय या भागाच्या विकासास निवडून दिलेल्यांकडून झालाय. आम्ही आपल्या गावी आपल्या वाडीवर, वस्तीवर, आपल्या हक्काचा जागर करण्यासाठी आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी जाणीव जागरण यात्रेच्या निमित्ताने येत आहोत. या भागात आरोग्यसेवा, रोजगार…

0 Comments

‘लाडकी बहिण‘ योजनेबाबत राष्ट्रवादीकडून ऋण व्यक्त 

‘लाडकी बहिण‘ योजनेंतर्गत लाभार्थींना दोन महिन्यांचे एकूण तीन हजार प्राप्त झाले. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अदिती तटकरे यांचे सिंधुदुर्ग महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऋण व्यक्त करून अजितदादा पवार यांना राख्या पाठविण्यात आल्या. यावेळी प्रज्ञा परब, प्रिया…

0 Comments

ओंकार ओतारी यांचा ‘उत्कृष्ट तहसीलदार‘ म्हणून सन्मान

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ओरोस येथे महसूल विभागाचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सन २०२३-२४मध्ये महसूल विभागातील उप विभागस्तरावर उत्कृष्ट काम करणारे वेंगुर्ल्याचे तहसिलदार ओंकार ओतारी यांचा ‘उत्कृष्टतहसीलदार‘ म्हणून सन्मान करण्यात आला.    

0 Comments