आपल्याला आजाराशी लढायचंय; एकमेकांशी नाही
मानसिक आजाराला तोंड देणं म्हणजे दीर्घकाळाची लढाई असते. आजाराच्या बाह्य लक्षणांबरोबरच आजाराने त्रस्त व्यक्ती भावना-विचारांच्या पातळीवर सतत लढत असते. कुटुंबियांनाही बहुतांश वेळेला समाजाकडून होणारी अवहेलना, उत्पादकतेत एका व्यक्तीची होणारी कमतरता, आजारामध्ये होणारे चढ-उतार, उपचारांचा खर्च यांच्या ताणाला सामोरं जावं लागतं. मानसिक आजाराने…
