कलात्मकतेचा मांड उत्सव

निर्जिवाला सजिव करणाऱ्या कुळातच जन्म, त्यात कलेचा ईश्‍वर अशा कलेश्‍वराचा आशिर्वाद, त्यामुळे नेहमीच त्यांच्याकडून असे काही नाविन्यपूर्ण घडते की, ज्यामुळे त्यांचे नाव अबालवृद्धांच्या तोंडी असते. ही कथा नसून वास्तव आहे ते कुडाळ तालुक्यातील नेरुर गावातील ‘मेस्त्री‘ समाजातील कलाकारांचे. शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या…

0 Comments

‘काश्मीर फाईल्स’ च्या निमित्ताने

  काश्‍मीर फाईल्स या चित्रपटावर सोशल मीडिया वर खाली काही प्रतिक्रिया वाचनात आल्या. काश्‍मीर फाईल्स या चित्रपटाची स्टोरी इथे लिहून, त्याची तीव्रता शब्दांत मांडता येणार नाही. किडा मुंग्यांपेक्षाही वाईट पद्धतीने मारले गेलेले काश्‍मीरी पंडित मोठ्या पडद्यावर बघताना अंगाचा थरकाप उडतो आणि डोळ्यातून पाणी…

0 Comments

कुटुंबाची साथ मोलाची – खात्री बरं होण्याची

मानसिक  आजाराने त्रस्त व्यक्तीची वारंवार विविध पातळ्यांवर घसरण होत असते. त्यांच्या बौद्धिक पातळीवरच्या गोंधळामुळे दैनंदिन व्यवहार सुद्धा अवघड होऊन बसतात. सततच्या भावनिक - मानसिक चढ-उतारांमुळे नातेसंबंध बिघडतात. संवाद आणि इतर कौशल्यं कमी झाल्यामुळे सामाजिक जीवन विस्कळीत होते. उत्पादकता कमी होते किंवा अधून मधून…

0 Comments

आरोग्यसेविका विनिता तांडेल

26 जानेवारी 2021 रोजी डॉ. रुपेश पाटकर आणि त्यांच्या सहकऱ्यांमुळे माझा कातकरी वस्तीत जाण्याचा योग आला होता. तेव्हा...       “डॉक्टरीण बाई आल्या की, आम्हाला खूप आनंद वाटतो. त्या अगदी ममतेने, मायेने आमच्यासाठी खूप काही करतात. या डॉक्टरीणबाई आणि शाळेतल्या बार्इंनी मिळून आमच्या सुनांचे…

0 Comments

निसर्ग संवर्धन आणि व्यावसायिक दृष्टीचा संगम

मनोहर उर्फ रोहित रघुवीर आजगावकर (मो. 7588902953) यांचे काळसे-धामापूर येथील आजगावकर आजी किचन अँड इको स्टोअर हे दुकान सोशल मिडियावर चर्चेत आलं आहे. शिवाजी विद्यामंदिर काळसे येथे शालेय शिक्षण घेऊन भारतीय विद्यापीठ, मुळशी येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या रोहितला कोरोना लॉकडाऊनमुळे नोकरी…

0 Comments

लता मंगेशकरांना शिवाजी विद्यापीठाने दिली डी.लिट.

लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठातर्फे बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांच्या हस्ते 21 नोव्हेंबर 1978 मध्ये डी.लिट. देऊन  सन्मानित केले. तत्कालीन कुलगुरू डॉ. भा. शं. भणगे यांनी लता मंगेशकर यांना डी.लिट. देताना कोणता निकष लावला होता, अशी विचारणा झाली होती. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर अतिशय…

0 Comments

गणित जत्रेच्या निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला आणि बौद्धिक क्षमतेला चालना देणारा अनोखा उपक्रम

थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये इरोड या गावी त्यांच्या आजोळी झाला. म्हणून 22 डिसेंबर हा दिवस गणित दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सन 2012 हे वर्ष (त्यांची 125 वी जयंती) भारत सरकारने गणित वर्ष म्हणून…

0 Comments

वीलपॉवर

“अरे क्या बात है! तुला खोटे वाटेल.... पण! आत्ताच आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. आणि तूझा फोन आला...“ अरे आता तुलाच फोन लावत होतो.! .. असा संवाद खूप वेळा आपल्या कानावर पडला असेल....       कधी कधी आपण सुद्धा कोणाचीतरी आठवण काढली असेल…

0 Comments

माझ्या राजा रं

दिदींचे पार्थिव संस्कार कव्हरेज करुन घरी परतत असताना डोक्यात आर्टिकल लिहायचं होतं.. ‘माझ्या शिवबाबा रं’. दिदींना दीनानाथ मंगेशकरानी घडवताना केलेला प्रवास मांडायचा होता.. शिवबाबा ही लतादीदींना हाक मास्टर दीनानाथ मारायचे. मोठं आर्टिकल लिहायचे होते. पण घरी आलो आणि दमल्यामुळे नाही जमलं.. पण पहाट…

0 Comments

डॉ. अनिल अवचट

अलिकडे  पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. महाडजवळच्या बिरवाडी इथल्या प्राथमिक केंद्रात कार्यरत राहून विंचूदंशासंदर्भात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. हिंमतराव बावस्करांचं नाव पुरस्कारार्थींच्या यादीत होतं. अनेक वर्षांपूर्वी शाळेत असताना डॉ. बावस्करांविषयी पहिल्यांदा वाचलं होतं. ते लिहिलं होतं अनिल अवचटांनी. डॉक्टरांच्या कार्याची महती कळण्याचं ते वय…

0 Comments